मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

"आजचा हा क्षण आदळआपट करण्याचा नाही तर आनंद व्यक्त करण्याचा" मुख्यमंत्र्यांचे नारायण राणेंना प्रत्युत्तर

"आजचा हा क्षण आदळआपट करण्याचा नाही तर आनंद व्यक्त करण्याचा" मुख्यमंत्र्यांचे नारायण राणेंना प्रत्युत्तर

"आजचा हा क्षण आदळआपट करण्याचा नाही तर आनंद व्यक्त करण्याचा" मुख्यमंत्र्यांचे नारायण राणेंना प्रत्युत्तर

"आजचा हा क्षण आदळआपट करण्याचा नाही तर आनंद व्यक्त करण्याचा" मुख्यमंत्र्यांचे नारायण राणेंना प्रत्युत्तर

Uddhav Thackeray on Narayan Rane: सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या (Chipi Airport) लोकार्पण मुख्यमंत्री उद्वव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते पार पडले.

  • Published by:  Sunil Desale
सिंधुदुर्ग, 9 ऑक्टोबर : चिपी विमानतळ (Chipi Airport) उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आपल्या भाषणातून नारायण राणेंनी (Narayan Rane) केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. कोकणातील विकासाच्या कामात शिवसेनेचे पदाधिकारी अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप केला. तसेच श्रेयवादावरही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाष्य केलं. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या दरम्यान यावर प्रतिक्रिया दिली आहे. आजचा हा क्षण आदळआपट करण्याचा नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आजचा हा क्षण आदळआपट करण्याचा नाही तर आनंद व्यक्त करण्याचा आहे. मी ज्योतिरादित्य जी यांचे अभिनंदन करतो. तुम्ही इतके लांब राहून देखील मातीचा संस्कार विसरला नाहीत. शिवसेना आणि कोकणचे नाते मी सांगायला नको. शिवसेना प्रमुखांचे मस्तक कुठेही नाही पण कोकणच्या या भूमीत नतमस्तक झाले आहे. आजचा हा महत्वाचा दिवस आहे.आजच्या या विमानतळाच्या उद्घाटनानंतर कोकणची संपन्नता जगासमोर जाणार आहे. विकासाच्या कामात राजकारणाचे जोडे नको मुख्यमंत्र्यांनी पुढे म्हटलं, विकासाच्या कामात राजकारणाचे जोडे आणू नये. आपापसात नाही तर देशाच्या शत्रूवर तलवार  चालली पाहिजे. आपल्याला संधी मिळाली आहे त्याची माती न करता सोने करण्याचा प्रयत्न व्हावा. आज पहिले विमान इथे आले आहे. कोकणची महती जगभर पसरेल. यापुढील काळात पर्यटकांसाठी ज्या ज्या सुविधा देता येतील त्या त्या देण्यात येतील असे मी राज्याचा मुख्यमंत्री म्ह्णून आश्वासन देतो. याठिकाणी जगातले लोक यावे असे वाटत असेल तर सुविधा हव्यात. पर्यटन म्हटले की गोव्याचे नाव येते, आपण काही गोव्याच्या विरोधात नाही पण कोकणचे आपले ऐश्वर्य काकणभर जास्तच आहे. एवढे वर्ष का लागले विमानतळाला हे पाहायला पाहिजे. अनेकांनी कोकणचा कॅलिफोर्निया करू म्हटले होते पण काही झाले नाही. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य यांच्याशी बैठक चांगली झाली. महाराष्ट्राच्या विमानतळांविषयी ते खूप तळमळीने बोलत होते. चिपीच्या या विमानतळामुळे कोकणच्या जनतेला लाभ होणार आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. काय म्हणाले होते नारायण राणे? मी स्वत: छोटा-मोठा उद्योजक पण नाही. सिंधुदुर्गाचा विकास कोणत्या मार्गातून करता येईल. मग मला कुणीतरी सल्ला दिला की तुम्ही टाटा इन्स्टिट्यूटकडे जा. त्यांनी मला 481 पानांचा रिपोर्ट दिला तुम्ही गोव्याच्या सारखं टूरिझम स्पॉट करा. 1995 साली सत्ता शिवसेना-भाजपची आहे. त्यावेळी मुख्यमंत्री मनोहर जोशींना मी सांगितलं, हा जिल्हा पर्यटनासाठी देशपातळीवर आपण जाहीर कऱण्यासाठी केंद्राची परवानगी घेऊ, अर्ज केला परवानगी आली. सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा झाला. त्यानंतर सर्व सुविधा करण्यात आल्या. नंतर साहेबांच्या आशीर्वादाने मी राज्याचा मुख्यमंत्री झालो. त्यावेळी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडेंना सांगून एक-एक कामासाठी रस्ते, पूल बांधणीसाठी पैसे दिले. त्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी 118 कोटी दिले. 80-90 लाख जिल्ह्याला यायचे. ते 100 कोटींत येऊ लागले. आज जे काही इन्फ्रास्ट्रक्चर बनलं आहे त्याला कारण नारायण राणे आहे. दुसऱ्याचं नाव तिथं जवळपास येऊच शकत नाही असं नारायण राणेंनी म्हटलं. मुख्यमंत्र्यांना राणेंची विनंती इथल्या शाळा, वर्ग, शिक्षक... एकावेळी मी 340 शिक्षक आणले आणि आता शिक्षकांचा तुटवडा नाहीये. आज राज्यात दहावी-बारावी निकालात पहिले सात-आठ तरी सिंधुदुर्गातील असतात. त्याला कोण कारणीभूत आहे जनतेला माहिती आहे... ते श्रेय मी घेत नाही, त्यावेळी शिवसेनेचं होतं, साहेबांचं होतंं माझं नाहीये, मी निमित्त होतो. जसं सचिन तेंडुलकर बॅटिंग करताना सचिन जो स्कोअर करायचा... क्रेडिट कोणाला द्यायचा... माझं नाही बॅटचं आहे. मी क्रेडिट मला घेतच नाही आजही नाही. माननीय उद्धवजी एक विनंती आहे. माझ्याकडे काही कागदपत्रे आहेत फोटोज आहेत. मी आणि प्रभू याच जागेवरुन 15 ऑगस्ट 2009 रोजी भूमीपूजन करण्यासाठी आलो. त्याचवेळी समोरच्या बाजूने आंदोलन होत होते. विमानतळ होऊ देणार नाही. जमीन घेऊ देणार नाही, आम्हाल विमानतळ नको. नुसतं विमानतळापूरतं नाही तर रेडी बंदर सुद्धा. किती विरोध-किती विरोध? कोण करतंय विचारा? मी नावे घेतली तर राजकारण होईल. महिन्यााला कोण जाऊन उभं राहतं आणि कामं आडवतं? कोण आडवत होतं विचारा जरा असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. अहो भांड काय फोडायचं किती फोडायचं? तुम्ही समजता तसं इथे नाहीये. तेव्हा होतं आज नाहीये. म्हणून परिस्थिती बदलतेय. मला काही म्हणाचं नाहीये. तुम्ही आलात मला बरं वाटलं आणंद वाटला. सन्माननीय पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी इथला अभ्यास करावा. टाटांचा तो 481 पानांचा रिपोर्ट वाचावा. निसर्ग कसा ठेवावा आणि अनेक गोष्टी आहेत. तुम्ही वाचा आणि द्या त्यासाठी पैसे. अहो धरणाला एक रुपया नाही, कामच पुढे जात नाही. काय विकास? इथेही एअरपोर्टला पाणी नाहीये. कसला विकास? एअरपोर्ट झाला, विमानतळावरुन उतरल्यावर काय बघावं... हे खड्डे पहावे? विमानतळाचं उद्घाटन होण्यापूर्वी तुम्ही रस्ते आणि बाकीच्या गोष्टी करायला पहायला हव्यात असंही नारायण राणेंनी म्हटलं. विनायक राऊतांना टोला नारायण राणेंनी म्हटलं, मला आज कळालं विमानतळाचा मालक कोण? विरेंद्र म्हैसकर गेले आणि दुसरे आले कळलंच नाही ओ.... स्टेजवर आलो, विनायक राऊत माईक घेतात म्हटलं हा कार्यक्रम कुणाचा आहे. एमआयडीसीचा आहे म्हैसकर साहेबांचा आहे का प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा आहे. नियमाने करा... मान सन्मान जनता देईल.
First published:

Tags: Narayan rane, Sindhudurg, Uddhav thackeray

पुढील बातम्या