Home /News /maharashtra /

Chandrapur Temperature: महाराष्ट्र तापला, चंद्रपुरात आतापर्यंत सर्वाधिक तापमानाची नोंद

Chandrapur Temperature: महाराष्ट्र तापला, चंद्रपुरात आतापर्यंत सर्वाधिक तापमानाची नोंद

चंद्रपुरात आज हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली असून पारा 45.8 अंश सेल्सियसवर पोहचला होता. प्रचंड उष्णतेमुळे चंद्रपुरातील नागरिकांना कामासाठी घराबाहेर पडताना अक्षरश: कसरत करावी लागत होती.

    मुंबई, 28 एप्रिल : यंदा उन्हाळ्याची भयंकर तीव्रता जाणवत असून रखरखत्या उन्हामुळं नागरिक हवालदिल झाले आहे. चंद्रपुरात (Chandrapur Temperature) आज हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली असून पारा 45.8 अंश सेल्सियसवर पोहचला होता. प्रचंड उष्णतेमुळे चंद्रपुरातील नागरिकांना कामासाठी घराबाहेर पडताना अक्षरश: कसरत करावी लागत (Summer Hit) होती. चंद्रपूरशिवाय आज अहमदनगर 43.7, औरंगाबाद 34.1, मालेगाव 43.0, नांदेड 42, परभणी 43.7, सांगली 40.2, सातारा 40.3, सोलापूर 43 या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पार उच्चांकी राहिला. वाढलेल्या तापमानामुळे लोकांना दैनंदिन कामात अडचणींचा सामना करावा लागला. हे वाचा - Corona च्या लक्षणांमध्ये आणखी एकाची भर, 'या' नव्या लक्षणानं वाढवलं टेन्शन चंद्रपूर शहरातील तापमानाची दिवसेंदिवस विक्रमी नोंद होत आहे. गेल्या 30 मार्चला चंद्रपूर जगातील तिसऱ्या क्रमांकाचं उष्ण शहर ठरलं होतं. त्यादिवशी तापमानाचा पारा 43.4 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता, आज तेही रेकॉर्ड मोडत तापमान 45.8 अंश सेल्सियसवर पोहचलं होतं.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Chandrapur, Summer hot

    पुढील बातम्या