या आहेत आजच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातम्या

या आहेत आजच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातम्या

आजच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा

  • Share this:

भाजप आणि शिवसेना या मित्रपक्षांमध्ये सध्या कमालीचा तणाव आहे. शिवसेना मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. अशा परिस्थितीत हे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोनही नेते मुंबईत एकाच व्यासपीठावर एकत्र होते. या दरम्यान त्यांच्यात बैठक झाल्यानं राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

छत्तीसगडमध्ये 20 नोव्हेंबरला (मंगळवारी)विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात होणारं हे मतदान 72 जागांसाठी लढवण्यात येणार आहे. यात छत्तीसगडच्या अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

आजही आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधक विधीमंडळात आक्रमक होण्याची शक्यता आहे. कारण सोमवारी विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आरक्षणाच्या मु्द्यावरून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अधिवेशन सुरू झाल्यानंतरही विरोधकांनी घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्यमंत्री शोकप्रस्तावावर ठाम राहिले आणि त्यांनी भाषण सुरू केलं. दरम्यान विरोधी पक्षातल्या काही आमदारांनी मराठा आरक्षणाची मागणी करणारे बॅनर परिधान करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तर एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर पुन्हा एकदा विरोधक आक्रमक होणार असं दिसतं आहे.

राज्य सरकारनं यंदाच्या अधिवेशनात 20 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत. आत्तापर्यंत  1 लाख 63 हजार कोटीच्या पुरवणी मागण्या मांडल्याचा विक्रम आहे. आणि या मागण्यांमुळे राज्याची आर्थिक शिस्त बिघडल्याचे चित्र दिसत आहे. खरं तर अर्थसंकल्पावेळी योजनांसाठी आर्थिक तरतूद केली जाते. पण त्यानंतरही प्रत्येक अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पाव्यतिरिक्त पुरवण्या मागण्यांचा पाऊस पडल्याचे दिसतं. त्यामुळे विधीमंडळात यासंबंधी चर्चा केली जाणार आहे.

20 नोव्हेंबरला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई महानगर पालिकेतील पत्रकार कक्षाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर  मुंबई मराठी पत्रकार संघात एका दिवाळी अंकाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

First published: November 20, 2018, 7:50 AM IST

ताज्या बातम्या