केंद्रीय पथक करणार साताऱ्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा, दिवसभरातील 5 महत्त्वाच्या बातम्या

केंद्रीय पथक करणार साताऱ्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा, दिवसभरातील 5 महत्त्वाच्या बातम्या

आज दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

  • Share this:

केंद्रीय पथक पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यासाठी महाराष्ट्रात

केंद्रीय पथक आज पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहे. केंद्रातील एक पथक सातारा सांगली दौऱ्यासाठी येत आहे. पूरस्थितीची पाहाणी साताऱ्यातील पाटण तालुक्यातील तांबवे गावापासून करणार आहेत.

मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज जालन्यात पत्रकार परिषद होणार आहे. महाजनादेश यात्रेनिमित्त बुधवारी झालेल्या सभेनंतर आजच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आदित्य ठाकरेंचा अकोला दौरा

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंची जनसंवाद यात्रा आज अकोल्यात असणार आहे.

काँग्रेस छाननी समितीची बैठक

ज्योतिरादित्य सिंधिंयांच्या अध्यक्षतेखाली आज काँग्रेस छाननी समितीची बैठक होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा उमेदवारांच्या नावावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

बेस्ट कर्मचारी संपावर ठाम

बेस्ट कर्चमाऱ्यांचं उपोषण 2 दिवसानंतरही सुरूच राहणार आहे. बेस्ट कर्मचारी कृती समितीचे प्रमुख शशांक राव यांनी 10 टक्के वेतनवाढ मान्य नसल्याचं सांगितलं. खरंतर उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानावर बैठक झाली. यात 2 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यात सातवा वेतन आयोगाच्या धरतीवर बेस्ट कर्मचाऱ्यांना पगार देण्याचा निर्णय झाला. महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणं बेस्टच्या कामगारांनाही सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यानंतरही शशांक राव यांची कामगार संघटना उपोषण सुरु ठेवण्यावर ठाम आहे.

INX मीडिया प्रकरणी आज पुन्हा सुनावणी

आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना ईडीकडून होणाऱ्या अटकेपासून एक दिवसाचा दिलासा मिळाला होता. त्यांना बुधवारी एक दिवसाची सूट देण्यात आली असून, या प्रकरणात आज पुन्हा सुनावणी होणार आहे.

कलम 370 बाबात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी

जम्मू आणि काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारचा निर्णयाला आव्हान देणाऱ्या विविध याचिकांवर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे सुनावणी होणार आहे.

देशात 75 नवीन मेडिकल कॉलेज लवकरच सुरू होणार

देशात नवी 75 मेडिकल कॉलेज सुरु होणार आहेत. 24 हजार कोटी रुपये खर्च करून मेडिकल कॉलेजची उभारणी केली जाणार आहे. याचं बरोबर 15 हजार 700 डॉक्टरांची भरती केली जाणार आहेत. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा निर्णय, 'इतकं' अनुदान जमा होणार थेट बँक खात्यात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: top news
First Published: Aug 29, 2019 07:56 AM IST

ताज्या बातम्या