नाणार प्रकल्पग्रस्तांनी आज राज ठाकरेंची निवासस्थानी घेतली भेट

नाणार प्रकल्पग्रस्तांनी आज राज ठाकरेंची निवासस्थानी घेतली भेट

काल या संघटनेच्या लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर या संघटनेचे कार्यकर्ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचीही भेट घेणार आहेत.

  • Share this:

14 एप्रिल : रत्नागिरी येथील नेणार इथं होऊ घातलेल्या ऑईल रिफायनरी प्रकल्पाविरोधात कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे.

ही संघर्ष संघटना या प्रकल्पाविरोधात राज्यातील प्रमुख नेत्यांची भेट घेऊन आपल्या विरोधाला व्यापक पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करते आहे. राज यांनी यापूर्वीच रत्नागिरीत जाऊन या प्रकल्पाला विरोध दर्शवला होता. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हा प्रकल्प होणारच असं स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारनं जगातील सगळ्यात मोठी ऑईल कंपनी असलेल्या अराम्को या कंपनीचा या प्रकल्पात सहभाग असल्याचं घोषितही केलंय.

काल या संघटनेच्या लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर या संघटनेचे कार्यकर्ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचीही भेट घेणार आहेत.

First published: April 14, 2018, 9:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading