12 जानेवारी : मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यात आज माँ जिजाऊंचा जन्मोस्तव साजरा होतोय. सकाळी 7 वाजताची जिजाऊंची आरती नगरपालिकेतर्फे पार पडली.आज सिंदखेड राजा नगरीत लाखोंचा जनसमुदाय एकत्र येणार असून जिजाऊंना वंदन करण्यासाठी अनेक दिग्गज मातृतीर्थ सिंदखेड नगरीत दाखल होतायत.
पहाटेपासूनच मोठ्या संख्येनं शिवप्रेमी सिंदखेड राजामध्ये जिजाऊंना वंदन करण्यासाठी दाखल होताना दिसतायत. शिवप्रेमींची आज होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवलाय.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जिजाऊ जन्मस्थळावर जाऊन जिजाऊंना अभिवादन केले. केजरीवाल यांची आज बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा इथं सभा आयोजित करण्यात आलीये. या महाराष्ट्र संकल्प सभेसाठी राज्यभरातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झालेत. जिजाऊ जन्मोत्सवाचे औचित्य साधून या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Arvind kejriwal, Jijau, Sindkhed, अरविंद केजरीवाल, जिजाऊ, सिंदखेड