Home /News /maharashtra /

'आज हमारी तो कल तुम्हारी बारी' ED कारवाईवरुन विजय वडेट्टीवारांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

'आज हमारी तो कल तुम्हारी बारी' ED कारवाईवरुन विजय वडेट्टीवारांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

'आज हमारी तो कल तुम्हारी बारी' ED कारवाईवरुन विजय वडेट्टीवारांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

'आज हमारी तो कल तुम्हारी बारी' ED कारवाईवरुन विजय वडेट्टीवारांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

Vijay Wadettiwar on ED action: राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एक मोठं विधान केलं आहे.

नांदेड, 21 ऑक्टोबर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नेत्यांच्या विरोधात तसेच नेत्यांच्या निकटवर्तीच्यां विरोधात ईडीकडून कारवाई सुरू आहे. या कारवाईवरुन राजकीय वातावरण तापलेले असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी एक मोठं विधान केलं आहे. आज आमची तर उद्या तुमची वेळ असं म्हणत चंद्रकांत पाटलांना (Chandrakant Patil) आव्हान दिलं आहे. ईडीची पुढची कारवाई नांदेडला होणार असल्याचे संकेत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. त्यावरून कॉंग्रेसचे मदत आणि पुर्नवसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पाटील यांना आव्हान दिले. विजय वडेट्टीवार म्हणाले, नांदेड की बारी.... काही हरकत नाही, उद्या तुमची बारी असेल. सत्ता कोणाच्या बापाची नेहमीसाठी नसते लक्षात ठेवा. सत्ता बदलत असते आणि सगळ्यांची घर काचेची आहेत. किमान खिडकी तरी काचेची असते. दगड तर पडणार... नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभेची पोटनिवडणुक सुरू आहे. देगलूरमध्ये आयोजित प्रचार सभेत विजय वडेट्टीवार यांनी हे विधान केले आहे. विजय वडेट्टीवार यांनी पुढे म्हटलं, केंद्रात आमची सत्ता आल्यास आम्ही देखील अशीच कारवाई करू. चंद्रकांत पाटलांनी दिले होते ईडीच्या कारवाईचे संकेत भाजप प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ईडीच्या कारवाई बाबत भाष्य केले होते. नांदेडमधील काँग्रेस नेत्यांवर ईडीची पुढची कारवाई होईल असं संकेत त्यांनी अप्रत्यक्षपणे दिले होते अर्थात त्यांचा रोख काँगेसचे नांदेड मधील नेते अशोक चव्हाण यांच्याबद्दल होता. या पुढची ईडीची कारवाई नांदेडमध्ये होणार असल्याचे संकेतच खुद्द भाजपाचे प्रदेशाअध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. तुम्हाला माझ्या हसण्याचा काय अर्थ काढायचा तो काढा? असंही पाटील सांगून मोकळे झाले. काही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये एका व्यापाऱ्याच्या कार्यालयात देखील आयकर विभागाने धाड टाकली. ईडी किंवा आयकर विभागाची आता पुढची कारवाई नांदेडच्या नेत्यावर होणार का? असा प्रश्न भाजपाचे प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारला असता त्यांनी अप्रत्यक्षपणे तसे संकेत दिले. अशोक चव्हाण म्हणाले... 'त्यांना एवढी माहिती कुठून मिळते हे मला माहिती नाही. मला यावर अधिक भाष्य करायचं नाही. पण निवडणुकीच्या तोंडावर चर्चेत राहण्यासाठी ते अशी विधान करत असतात. निवडणुकीच्या काळात त्यांना संभ्रम निर्माण करायचा आहे', असा टोला चव्हाण यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Chandrakant patil, ED, Vijay wadettiwar

पुढील बातम्या