Home /News /maharashtra /

खासदारकीसाठी संभाजीराजेंचा शिवसेनेत प्रवेश?, 12 वा. मुख्यमंत्र्यांसोबत वर्षावर भेट

खासदारकीसाठी संभाजीराजेंचा शिवसेनेत प्रवेश?, 12 वा. मुख्यमंत्र्यांसोबत वर्षावर भेट

आज छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) दुपारी 12 वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची भेट घेणार आहेत.

    मुंबई, 23 मे: आज छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) दुपारी 12 वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची भेट घेणार आहेत. विधानसभा आमदारांमधून निवडून द्यावयाच्या राज्यसभेच्या (Rajya Sabha) सहाव्या जागेसाठी अपक्ष उमेवार म्हणून उभे राहण्याचा निर्धार छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे. त्यानंतर संभाजीराजे छत्रपतींनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांची उमेदवारी जाहीर करू असा पवित्रा शिवसेनेनं (Shiv Sena) घेतला आहे. यानंतरच छत्रपती संभाजी राजेंना वर्षावर येण्याचं आमंत्रण दिलं आहे. दरम्यान संभाजीराजेंनी निमंत्रण स्वीकारलं. यामुळे खासदारकीसाठी संभाजीराजे शिवबंधन बांधणार का? याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. दरम्यान अजून तरी राजे हे शिवसेनेत प्रवेश करण्यास तयार नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दुसरीकडे संभाजीराजे यांनी शिवसेनेची ऑफर न स्वीकारल्यास अभिनेत्री उर्मिला मातोंडकर किंवा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्याचा शिवसेना नेतृत्वाचा विचार आहे. संभाजीराजे सर्व मराठा समन्वयकांशी चर्चा करणार शिवसेनेनं दिलेल्या ऑफरबद्दल छत्रपती संभाजीराजे सर्व मराठा मोर्चाच्या समन्वयकांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आज दुपारी 12 वाजता वर्षावर काय होतं हे पाहणं उत्सुकतेचं आहे. काय आहे प्रकरण? मातोश्रीचा चक्रव्यूह संभाजी राजे भेदू शकणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेवर संभाजीराजेंनी (Sambhaji Raje) अपक्ष निवडणूक लढण्याचं जाहीर केलं. तर शिवसेनेने सुद्धा या जागेवर आपला उमेदवार देण्याचं म्हटलं आहे. यानंतर संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (CM Uddhav Thackeray) भेट घेतली. या भेटीत संभाजीराजेंना शिवसेनेकडून सहाव्या जागेवर उमेदवारीची ऑफर देण्यात आली. त्यानंतर आज मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी आज सकाळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली. छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी संजय राऊत यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर संजय राऊतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत काय झालं? याबाबत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Sambhajiraje chhatrapati, Shivsena, Uddhav Thackeray (Politician)

    पुढील बातम्या