जागतिक जैवविविधता दिनानिमित्त कोल्हापुरातल्या 8 प्रजातींना मानचिन्ह

जागतिक जैवविविधता दिनानिमित्त कोल्हापुरातल्या 8 प्रजातींना मानचिन्ह

कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्राणी, पक्षी, फळं, फुलं, वृक्ष यांमधल्या 8 प्रजातींना मानचिन्ह देण्यात आलंय. त्यामुळे सह्याद्रीच्या घाटांशेजारच्या कोल्हापूर जिल्ह्याची ओळख आता नव्यानं अधोरिखित झालीय.

  • Share this:

संदीप राजगोळकर, 22 मे : आज (22 मे ) जागतिक जैवविविधता दिन.याच दिनाच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्राणी, पक्षी, फळं, फुलं, वृक्ष यांमधल्या 8 प्रजातींना मानचिन्ह देण्यात आलंय. त्यामुळे सह्याद्रीच्या घाटांशेजारच्या कोल्हापूर जिल्ह्याची ओळख आता नव्यानं अधोरिखित झालीय.

कोल्हापूर जिल्ह्यातलं राधानगरी अभयारण्य हे गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. या गव्यासोबतच ग्रेट हॉर्नबिल, करवंदे, भेरली माड म्हणजेच पालम ट्री, सोनघंटा हे फूल, ग्रेट ऑरगन ट्रिप हे फुलपाखरू, स्वच्छ पर्यावरणाचे निर्देशक असलेलं देवगांडूळ आणि सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये डारविनी सरडा यांचा समावेश करण्यात आलाय. या प्रजातींचं संवर्धन, संशोधन, प्रबोधन करण्याच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं पाऊल कोल्हापूरमध्ये उचलण्यात आलंय. वनविभागाच्या वतीनं ही मानचिन्ह प्रदान करण्यात आली असून कोल्हापूर जिल्ह्यात अनेक प्रजातींचा समावेश असल्याचीही माहिती समोर आलीय.

कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी, चंदगड, पाटगाव, आंबा, गगनबावडा या भागात मोठं जंगल आहे.  त्यामध्ये 160 फुलांच्या जाती, 225 पक्षांच्या जाती, 2227 सपुष्पांच्या जाती असल्याची माहिती वनविभागाच्या अभ्यासात समोर आलीय. या प्रजातींच्या संवर्धनासाठी जिल्ह्यातल्या 1 हजार ग्रामपंचायतींमध्ये समित्यांची स्थापना करण्यात आली असून त्यानुसार आता पर्यावरणाच्या दृष्टीनं अभ्यासही होणार आहे.

सध्याच्या युगात मानव जातीच्या हस्तक्षेपामुळं वन्य प्राण्याचं अस्तित्व धोक्यात आलंय.पण कोल्हापूरमध्ये आता नष्ट होणाऱ्या प्रजातींना मान चिन्ह प्रदान करुन याच पर्यावरणाचं संवर्धन करण्याचा जो प्रयत्न केला जातोय तो नक्कीच कौतुकास्पद आहे.

First published: May 22, 2017, 3:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading