आज दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाच्या 5 बातम्या

आज दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाच्या 5 बातम्या

  • Share this:

राज्य मंत्रीमंडळ बैठक

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे.

राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे.

सेना-युतीची चर्चा

शिवसेना-भाजप युतीची चर्चा करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सेनेसोबत युतीच्या चर्चेला आता सुरुवात होणार आहे.

काँग्रेस निवड समितीची बैठक

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत काँग्रेसची बैठक होणार आहे. या बैठकीत लोकसभेच्या जागा वाटपाबाबत निर्णय चर्चा होणार आहे. बहुजन वंचित आघाडीकडून भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी ३१ जानेवारीपर्यंत अल्टीमेटम दिला होता, त्यावरही निर्णय होण्याची शक्यता आहे.

परीक्षा पे चर्चा

फेब्रुवारी महिन्यात 10 वी आणि 12 वीची परीक्षा होणार आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, सत्यपाल सिंग सकाळी10.45 वाजता दूरदर्शन वाहिनीवरून विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे.

सुनंदा पुष्कर सुनावणी

काँग्रेसचे नेते शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणावर आज दिल्ली पटियाला न्यायालयात सुनावणी होणार आहे. सुनंदा पुष्कर यांचा 17 जुलै 2014 रोजी दिल्लीतील एका पंचतारांकित हाॅटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. थरूर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत करण्याचा आरोप करण्यात आला आहे.

=============

First published: January 29, 2019, 7:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading