या आहेत आजच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातम्या..

या आहेत आजच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातम्या..

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह पंढरपूरमध्ये दाखल होत असन, विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर दुपारी 3 वाजता ते जाहीर सभा घेणार आहेत.

  • Share this:

उद्धव ठाकरे यांची पंढरपूरा येथे सभा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह पंढरपूरमध्ये दाखल होत असन, विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर दुपारी 3 वाजता ते जाहीर सभा घेणार आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे शरयू नदीप्रमाणेच चंद्रभागेची देखील महाआरती करणार आहेत. पंढरपुरात शिवसेनेची न भुतो न् भविष्यती अशी महासभा होईल असा दावा, उद्याच्या कार्यक्रमाची तयारी करणाऱ्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि मंत्र्यांनी केलाय. शिवसेनेच्या महासभेसाठी पंढरपूर सज्ज झालं असून मोठ्या संख्येनं शिवसैनिकांची पावलं पंढरीच्या दिशेनं वळू लागली आहेत.

 

मेट्रो सारख्या दिसणाऱ्या एसी लोकलचं फर्स्ट लुक 

चेन्नई येथे सोमवारी आईसीएफ तर्फे मेट्रो सारख्याच दिसणाऱ्या एसी लोकलचं फर्स्ट लुक दाखवण्यात येणार आहे. कशी असणार आहे ही एसी लोकल याची माहिती देणारा एक रिपोर्ट.

 

पृथ्वीराज चव्हाण यांची पत्रकार परिषद

माजी मुख्यमंत्री तथा कॉंग्रेसचे प्रमुख नेते पृथ्वीराज चव्हाण हे दुपारी 3 वाजता मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत. आगामी निवडणुकांसंदर्भा ते कोणती महत्त्वाची घोषणा करतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

 

कोल्हापूरात साखर कारखानदारांची पत्रकार परिषद

कोल्हापूरात आज साखर कारखानदारांची एफआरपी संदर्भात पत्रकार परिषद बोलावण्यात आली आहे. यात साखर कारखानदार कोणती भूमीका मांडतात हे महत्त्वाचं ठरणार आहे.

 

'राफेल'साठी नांदेड आणि धुळ्यात काँग्रेसचा मोर्चा

'राफेल' संदर्भात संसदीय समितीद्वारे चौकशी व्हावी या मागणीसाठी कॉंग्रेसच्यावतीनं आज नांदेड आणि धुळ्यात मोर्चा काढला जाणार आहे. त्यासंदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडींसह अन्य बातम्यांसाठी पहा न्यूज18 लोकमत.

 

 

First published: December 23, 2018, 11:32 PM IST

ताज्या बातम्या