बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने महापौर बंगल्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकांचं गणेश पूजन होणार आहे. या स्मारकाला राज्य सरकारने 100 कोटींची निधी जाहीर केला ाहे.
मराठा आरक्षणावर सुनावणी
मराठा आरक्षणाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. याप्रकरणी राज्य सरकार काय भूमिका मांडतं, हे महत्त्वाचं आहे. अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली आहे.
ओबीसी नेते घेणार शरद पवारांची भेट
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी आणि धनगर नेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहे. दुपारी २ वाजता ही भेट होणार आहे. राज्य सरकारने नुकतेच मराठा आरक्षण जाहीर केले आहे. परंतु, धनगर आरक्षणाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. तर ओबीसी समाजामध्ये मराठा आरक्षणावरून विरोध झाला होता. त्यामुळे ही भेट महत्त्वाची ठरणार आहे.
मोदी साधणार राज्यातील कार्यकर्त्यांशी संवाद
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार रोजी व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे, बारामती, गडचिरोली, हिंगोली, नांदेड, नंदुरबार येथील भाजपा कार्यकर्त्यांशी पोलिंग बुथबाबत संवाद साधणार आहेत. उद्या दुपारी साडेचार वाजता बारामती येथील कविवर्य मोरोपंत सभागृहात याचे आयोजन करण्यात आले आहे.
ईव्हीएम हटाव
अमेरिकेचा हॅकर सय्यद शुजा याने 2014 च्या निवडणुकीत ईव्हीएममध्ये छेडछाड झाली होती असा दावा केल्यामुळे खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्या नेतृत्वाखाली ईव्हीएम हटाव आंदोलन करण्यात येणार आहे.
============================