कमलनाथ ते महाराष्ट्र केसरीपर्यंतच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातम्या

कमलनाथ ते महाराष्ट्र केसरीपर्यंतच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातम्या

मध्यप्रदेशमध्ये मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शनिवारी राज्यपाल आनंदी बेन पटेल यांची राजभवनात भेट घेतली.

  • Share this:

सोमवारी कमलनाथ यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार

मध्यप्रदेशमध्ये मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शनिवारी राज्यपाल आनंदी बेन पटेल यांची राजभवनात भेट घेतली. यावेळी त्यांनी 25 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याची माहिती दिली. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर 7 जानेवारीपासून विधानसभेच्या कामकाजाला सुरूवात होईल आणि त्याच दिवशी आमदारांच्या मंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर राज्यपालांचं 8 जानेवारीला अभिभाषण होणार आहे.

भारतात मुस्लिमांविरोधात असहिष्णुता होतीच

ज्येष्ठ अभिनेता नसरुद्दीन शाह यांच्या विधानाचा धागा

पकडून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतावर टीका केली. भारतात मुस्लिमांविरोधात असहिष्णुता होतीच आणि त्यामुळेच जिन्नांही पाकिस्तान वेगळा केला होता असं इम्रान खान म्हणाले. दोन दिवसांपूर्वी शाह यांनी बुलंदशहरमध्ये घडलेल्या हिंसाचारावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. आपल्या देशात पोलिसांच्या जीवापेक्षा गायीच्या जीवाला जास्त महत्त्व आलं आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली होती.

गुजरात आणि झारखंड पोट निवडणुकीचा निकाल

गुजरात आणि झारखंड विधानसभा पोट निवडणुकीचा आज 23 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. गुजरातमध्ये एका जागेसाठी तर झारखंडमध्येही एका जागेसाठी ही मतमोजणी होत आहे. 20 डिसेंबरला या जागांसाठी मतदान होणार आहे.

महाराष्ट्र केसरी कोण?

जालन्यात महाराष्ट्र केसरी 2018 चं आयोजन करण्यात आलं आहे. आज रविवारी महाराष्ट्राचा केसरी कोण? याचा फैसला होणार आहे. बाला रफीक आणि अभिजीत कटके यांच्यात अंतिम लढत होणार आहे.

कपिल शर्मा परत येतोय

छोट्या पडद्यावर कॉमिडी किंग कपिल शर्मा पुन्हा एकदा एंट्री करत आहे. कपिल शर्मा आता 'द कपिल शर्मा शो'या कार्यक्रमातून प्रेक्षकांना भेटीला येणार आहे. या पहिल्या कार्यक्रमात बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान हजेरी लावणार आहे. कपिलच्या कार्यक्रमात कृष्‍णा अभिषेक, भारती सिंह, सुमोना चक्रवर्ती, चंदन प्रभाकर आणि कीकू शारदा ही टीम असणार आहे.

First published: December 23, 2018, 7:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading