मोदींच्या हस्ते बाळासाहेबांच्या स्मारकाचे भूमीपूजन? आजच्या 5 मोठ्या बातम्या

मोदींच्या हस्ते बाळासाहेबांच्या स्मारकाचे भूमीपूजन? आजच्या 5 मोठ्या बातम्या

  • Share this:

मोदींच्या हस्ते बाळासाहेबांच्या स्मारकाचे भूमीपूजन?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २३ जानेवारीच्या मुंबई दौऱ्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे दौ-यासंदर्भात नियोजनाकरता राजशिष्टाचार विभागाची बैठक संपन्न झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला बाळासाहेबांच्या स्मारकाच्या गणेश पूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एका व्यासपीठावर एकत्र आणण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न सुरू आहे.

ओबीसी नेते आज राज्यपालांच्या भेटीला

मराठा आरक्षणामुळे ओबीसी नेते आज राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेणार आहे. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्यासह 40 विविध जाती संघटना राज्यपालांची भेट घेणार आहे. सरकार बरखास्त करा अशी मागणी करणार, या संघटना करणार आहे.

काँग्रेस संघर्ष यात्रा कोकणात

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा आता कोकणात पोहोचली आहे. नारायण राणे यांच्या बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकणात काँग्रेसचे नेते सभा घेणार आहे. आज कुडाळ येथे जाहीर सभा होणार असून या सभेला वरिष्ठ नेते हजर राहणार आहे.

चंद्रपुरात बहुजन वंचित आघाडीची सभा

भारिप बहुजन संघटनेचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे नेते असाउद्दीन ओवेसी यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. आज या दोन्ही नेत्यांनी चंद्रपूर इथं सभा होणार आहे.

बाल शौर्य पुरस्कार

आज राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांच्या हस्ते बालवीरांना बाल शौर्य पुरस्कार संध्याकाळी प्रदान होणार आहे. यावर्षी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दिले जाणार असून त्यात नवनिर्मिती सहा, बुद्धिमत्ता तीन, समाजसेवा तीन, कला आणि संस्कृती पाच, क्रीडा सहा, शौर्य तीन याप्रमाणे पुरस्कार २०१९ मध्ये दिले जाणार आहेत.

====================================

First published: January 22, 2019, 6:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading