भाजपच्या अनुसूचित परिषदेचा समारोप
भाजपच्या अनुसूचित जाती जमाती आघाडीचे राष्ट्रीय परिषदेच्या आज समारोप होणार आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांची उपस्थिती राहणार आहे.
मुंबई मॅरेथॉन
16 व्या मुंबई मॅरेथॉनला आज सुरुवात होणार आहे. या मॅरेथाॅनमध्ये 46 हजारपेक्षा जास्त अॅथलिट्स भाग घेणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.
मुंबईत तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक
मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11.30 पासून ते संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंत हा ब्लाॅक असणार आहे.
'काँग्रेसची मदार 'आयातां'वर'
लोकसभेत जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी काँग्रेसची आयात उमेदवारांवर मदार असणार आहे. माजी पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस सोडून गेलेले उमेदवार परत पक्षात येतील, असा दावा केला आहे. आज त्याबद्दल खुलासा होण्याची शक्यता आहे.
अमरावतीत वंचित आघाडीची सभा
अमरावतीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सभा होणार आहे. भारिपचे प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम खासदार असादुद्दीन ओवैसींची संयुक्त सभा दुपारी 2वाजता पार पडणार आहे.