राफेलप्रकरणी भाजप भलताच आक्रमक, आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या

राफेलप्रकरणी भाजप भलताच आक्रमक, आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या

डान्स बारवर घालण्यात आलेल्या अटी शिथील करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

  • Share this:

डान्सबार संदर्भातील अंतिम सुनावणी

मुंबईसह इतर शहरात डान्सबारमधली छमछम पुन्हा सुरू होणार की, नाही यावर सर्वोच्च न्यायालय आज गुरुवारी अंतिम निर्णय देणार आहे. डान्स बारवर घालण्यात आलेल्या अटी शिथील करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालय काय निकाल देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भाजप देशभरात पत्रकार परिषद घेणार

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजप देशभरात 70 ठिकाणी पत्रकार परिषद घेणार आहे. आजपासून या पत्रकार परिषदांना सुरुवात होणार आहे. राफेल विमान खरेदी प्रकरणी काँग्रेसला सडेतोड उत्तर देण्यासाठी या पत्रकार परिषद घेणार आहे.

शिवसेनेची बैठक

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. शिवसेनेनं राज्यातील मंत्री आणि नेत्यांची बैठक बोलावली आहे. राज्यात प्रचारासंदर्भातील दौरे आखण्यासाठी ही बैठक होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

पुणे पालिकेचा अर्थसंकल्प

पुणे महानगर पालिकेचा अर्थसंकल्प आज आयुक्त मांडणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे महापालिकेच्या 2018-19 च्या अर्थसंकल्पात 1500 कोटी रुपयांपेक्षा अधिकची तूट निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे आगामी 2019-20 च्या अर्थसंकल्पावर त्याचे पडसाद उमटण्याची चिन्ह आहे.

सुधीर मुनगंटीवार दुष्काळ आराखडा मांडणार

राज्याचे महसूलमंत्री सुधीर मुनगंटीवार औरंगाबाद दौऱ्यावर आहे. आज ते मराठावाडा विभागीय दुष्काळ आराखडा मांडणार आहे. राज्यात याच महिन्यात 900 गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या आधी 151 गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता.

==========================

First published: January 17, 2019, 6:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading