काँग्रेसपासून शिवसेनेपर्यंत...आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसपासून शिवसेनेपर्यंत...आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या

  • Share this:

बेस्ट संपावर न्यायालयात सुनावणी

मुंबईत बेस्टच्या संपावर आठव्या दिवशीही कोणताही तोडगा निघू शकला नाही. आज बेस्टच्या संपावर पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. मंगळवारीच मुंबई हायकोर्टाने बेस्टच्या कर्मचारी संघटनेला संप मागे घेण्याचे आदेश दिले होते. परंतु, संघटना संपावर ठाम होती.

शिवसेनेची बैठक

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेनं सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. शिवसेनेची राज्यभरातल्या प्रचार दौ-याबाबत ही बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

संजय निरुपम यांची पत्रकार परिषद

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून मुंबई उमेदवारांची पहिली यादी तयार करण्यात आली आहे.

दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा आणि उत्तर मुंबईतून कृपाशंकर सिंह हे मुख्य दावेदार आहेत. परंतु, उत्तर मुंबईतून संजय निरुपम यांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे संजय निरुपम पत्रकार परिषदेत कोणती मोठी घोषणा करणार हे पाहण्याचं ठरणार आहे.

आदित्य ठाकरे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर

शिवसेनेच्या युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे परभणी दौऱ्यावर आहे. आज दुपारी दोन वाजता ते झिरो फाटा येथे दुष्काळ निवारण संकल्प मेळावा घेणार आहे. त्यानंतर जय भवानी महिला सहकारी सूतगिरणीचे भूमिपूजन आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करणार आहे.

गिरीष महाजन पुन्हा राळेगणसिद्धीत

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आज ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची भेट घेणार आहे. अण्णांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. लेखी आश्वासन देऊनही लोकपाल आणि लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी झाली नाही, अशी अण्णांनी तक्रार केली होती.

First published: January 16, 2019, 6:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading