संजय राजपूत यांना अखेरचा निरोप
पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे पार्थिव आज त्यांच्या मूळगावी येणार आहे. बुलडाण्याचे जवान शहीद संजय राजपूत यांचं पार्थिव दुपारी 12 वाजेपर्यंत त्यांच्या गावी मलकापूर पोहोचणार आहे. त्याच्यावर अंत्यसंस्कार संध्याकाळी 4वाजता होण्याची शक्यता आहे.
नितीन राठोड यांच्यावर सकाळी अंत्यसंस्कार
पुलवामा हल्ल्यातील बुलडाणा जिल्ह्यातील लोणार येथील नितीन राठोड शहीद झाले. त्यांचं पार्थिव पहाटे पोहचणार आहे. लोणार येथे शहीद नितीन राठोड सकाळी 9वाजता अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे.
राज्यभरात निषेध
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 42 जवान शहीद झाले. या हल्ल्याचे देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. आज राज्यात ठिकठिकाणी पाकच्या हल्ल्याच्या निषेधार्थ रॅली, श्रद्धांजलीचे कार्यक्रम होणार आहे.
पंतप्रधान मोदी यवतमाळमध्ये
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मोदी यांचा पांढरकवडा यवतमाळ इथं सकाळी 10.30वाजता तर दुपारी 2 वाजता धुळ्यात कार्यक्रम होणार आहे. भुसावळमध्ये बांद्रा टर्मिनल-खान्देश एक्सप्रेसचं नरेंद्र मोदी यांचे लोकार्पण होणार आहे. भुसावळहून दुपारी 2:30 वाजता ही गाडी निघणार आहे.
परभणीत बहुजन वंचित आघाडीची सभा
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारिप नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे अध्यक्ष असाउद्दीन ओवेसी यांची परभणीत दुपारी 1 वाजता जाहीर सभा होणार आहे.