आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या

News18 Lokmat | Updated On: Nov 15, 2018 07:10 AM IST

आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या

मराठा आरक्षणाच्या अहवालात काय?

मराठा आरक्षणासंदर्भातील  मागासवर्गीय आयोग आपला अहवाल अखेर आज सादर करणार आहे. राज्याचे मुख्य सचिव डी. के.जैन यांच्याकडे हा अहवाल बंद पाकिटात सादर केला जाईल.

राज्य सरकार अहवाल मिळाल्यानंतर त्यासंबंधीचे पत्र कोर्टात सादर करेल.  मराठा आरक्षणाच्या मुद्या दुसऱ्यांदा कोर्टापुढे जाणार आहे. याआधी आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षण देण्याबाबत  कोर्टाने नकार दिला होता. त्यामुळे आता दुसऱ्यांदा मराठा आरक्षणाचा न्यायिक बाजू भक्कमपणे मांडता यावी यासाठी फडणवीस सरकारने  ख्यातनाम वकील हरीश साळवे यांची नियुक्ती करण्याचे ठरवले आहे.


गोविंद पानसरे  हत्येप्रकरणी अखेर अमोल काळे ताब्यात

Loading...

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येबाबत आज महत्त्वाचा खुलासा होण्याची शक्यता आहे. पत्रकार गौरी गौरी लंकेश आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अमोल काळे याचा ताबा  पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील तपास यंत्रणा म्हणजेच SIT ने घेतल्याची खात्रीलायक माहिती न्यूज18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे. अमोल काळे हा सनातन संस्थेचा साधक असून तो सध्या कर्नाटक राज्यातील सीआयडीच्या ताब्यात आहे आणि त्याचा ताबा महाराष्ट्र एसआयटीने घेतला . आज  अमोल काळे याला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अमोल काळे याचा ताबा घेण्यासाठी महाराष्ट्र एसआयटी प्रयत्नशील होती आणि या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.


मालेगाव स्फोटाच्या खटल्याची एनआयए कोर्टात सुनवाणी

२००८ मालेगाव स्फोट प्रकरणाची  मुंबई विशेष एनआईए कोर्टात आज पुन्हा सुनावणी होणार आहे. कर्नल पुरोहित आणि सुधाकर द्विवेदीने पीडितांच्या यादीवर आक्षेप घेतला आहे. दरम्यान, कोर्टाने ३० आॅक्टोबर रोजी या प्रकरणातील 7 जणांवर आरोप निश्चिती करण्यात आले होते. यामध्ये लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह इतर 5 जणांचा समावेश आहे.

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने म्हटलं की, ‘या सर्व जणांवर अभिनव भारत संघटनेद्वारे दहशत पसरवण्यासाठी कट करणे आणि 29 सप्टेंबरला झालेल्या घटनेत समावेश असल्याचा आरोप आहे. हे कृत्य दहशतवादामध्ये येतं.’


मध्यप्रदेशमध्ये अमित शहा यांच्या सभा

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आता भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी एंट्री घेतली आहे. आज अमित शहा इंदूर इथं पोहोचणार आहे. बडवानी इथं त्यांची ११ वाजता पहिली सभा होणार आहे. त्यानंतर  शाजापुर, बड़नगर इथं सभा घेणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राफेल करार, शबरीमला मंदिर वादावर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. त्यामुळे यावेळी अमित शहा विरोधकांनी काय प्रत्युत्तर देता याकडे लक्ष्य लागलंय. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही अमित शाह  खजुराहो, टीकमगड, सागर आणि दमोह इथं सभा घेतील. अमित शहा २६ नोव्हेंबरपर्यंत मध्यप्रदेशमध्ये तळ ठोकून असणार आहे.


दिपीका आणि रणवीर यांचा पुन्हा लग्न सोहळा

बाॅलिवूडची स्टारजोडी दिपीका पदुकोण आणि रणवीर सिंग अखेर लग्नबेडीत अडकली. बुधवारी दीपिका आणि रणवीरचं कोकणी पद्धतीनं लग्न झालं. हे लग्न दोन पद्धतीनं होणार होतंच. पहिल्या दिवशी कोकणी पद्धतीनं आणि दुसऱ्या दिवशी सिंधी पद्धतीने होणार आहे. रणवीर सिंग हा सिंधी आहे. त्यामुळे आज पुन्हा लग्नविधी त्याच्या या पद्धतीनं होणार आहे. विशेष म्हणजे, इटलीमध्ये या लग्न सोहळ्याला बाॅलिवूडचं कुणी उपस्थित नाही. या लग्नसोहळ्याला  फक्त घरातले आणि जवळचे फ्रेंड्स आहेत. सोमवारी रणवीर-दीपिकानं एकमेकांना अंगठीही घातली आणि औपचारिक साखरपुडा केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 15, 2018 06:39 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...