शेतकऱ्यांच्या एल्गारापासून मोदींच्या दौऱ्यापर्यंत...5 मोठ्या बातम्या

शेतकऱ्यांच्या एल्गारापासून मोदींच्या दौऱ्यापर्यंत...5 मोठ्या बातम्या

  • Share this:

कुंभमेळ्याला सुरुवात

मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर उत्तर प्रदेशमधील अलाहबाद म्हणजेच आजचे प्रयागराज इथं गंगा, यमुना आणि पुराणात उल्लेख असलेल्या सरस्वती या तीन नद्यांच्या संगमावर कुंभमेळा सुरू होणार आहे 15 जानेवारी ते 4 मार्च या काळात तब्बल 12 कोटी भाविक पवित्र स्नान करण्यासाठी येतील, असा अंदाज कुंभमेळा आयोजकांनी व्यक्त केला आहे.

बेस्टचा संप सुरूच

मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांचा सातव्या दिवशीही संप सुरूच आहे. आज बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पत्नी आणि इतर महिला मंत्रालयात मोर्चा काढणार आहे. यावेळी त्या मकरसंक्रांतीच्या निमित्ताने कडू तिळ वाटणार आहे.

शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार

पुणतांबेतून पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाचा एल्गार करणार आहे. शेतकरी समितीच्या कोअर कमिटीची आज बैठक आहे. या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरणार आहे.

पंतप्रधान मोदी केरळ दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळ दौऱ्यावर आहे. ओडिसामध्ये त्यांच्या हस्ते रेल्वे आणि महामार्गाचे लोकार्पण होणार आहे. बलांगीर आणि बिचुपाली दरम्यान नव्या रेल्वे मार्गाचे उद्घाटन सुद्धा मोदींच्या हस्ते होणार आहे.

आदित्य ठाकरे हिंगोलीत

युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आज नांदेड आणि हिंगोलीच्या दुष्काळी दौऱ्यावर असणार आहे. यावेळी त्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना पशु खाद्य वाटप करणार आहेत.

First published: January 15, 2019, 6:20 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading