Morning Alert: आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या

Morning Alert: आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या

मोलाना आझाद यांच्या जयंतीच्या निमित्ताने मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

  • Share this:

शरद पवार करणार मुस्लिम समाजाला मार्गदर्शन

पहिली मोठी बातमी - मोलाना आझाद यांच्या जयंतीच्या निमित्ताने मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अल्पसंख्यांक समाजाला मार्गदर्शन करणार आहे.  मुस्लिम समाजाला जवळ करण्यासाठी राष्ट्रवादीने मोलाना आझाद यांच्या जयंतीचे औचित्य साधून या  सकाळी १० वाजता मुंबईत या मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात शरद पवार काय भूमिका मांडतात हे पाहण्याचं ठरणार आहे.

प्रकाश आंबेडकर यांची नोंदवणार साक्ष

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पुणे कोर्टात सुनावणी होणार आहे. यावेळी भारिप बहुजन संघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांची साक्ष नोंदवण्यात येणार आहे. १ जानेवारी २०१८ रोजी भीमा-कोरेगावमध्ये 1 जानेवारीला किरकोळ वादातून दोन गटांमध्ये मोठा वाद झाला होता. वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर तरुणांनी रॅली काढली होती. त्याचवेळी पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने आंबेडकरी अनुयायी येत होते. रस्त्यावरील गर्दीतून झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे रुपांतर दगडफेक आणि जाळपोळीत झाली होती.

सबरीमाला वाद पुन्हा कोर्टात

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर मोठ्या विरोधानंतर सबरीमाला मंदिराचे द्वार महिलांसाठी उघडण्यात आले. तर दुसरीकडे याच प्रकरणी सुप्रीम कोर्टात तब्बल १३ याचिका दाखल करण्यात आल्या आहे. सुप्रीम कोर्टाने आधीच आपल्या निर्णयात मंदिराचे द्वार उघडण्याचे आदेश दिले होते.  मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगाई आणि न्यायमूर्ती एस के कौल यांच्या खंडपीठाने वकील मॅथ्यूज जे. नंदापारा यांना सांगितले की, 13 नोव्हेंबर रोजी याचिका दाखल करण्याबाबत आधीच आदेश देण्यात आला आहे.

सबरीमाला मंदिर वाचवण्यासाठी भाजपची 'रथ यात्रा'

केरळमधील भाजपने रविवारी सबरीमाला येथील भगवान अयप्पा मंदिरांची प्रथा आणि परंपरा वाचवण्यासाठी 'रथ यात्रे'ची घोषणा केली आहे.  भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी भाजप सर्व भक्तांच्या पाठीशी उभी असं सांगितल्यानंतर भाजपने  स्त्रियांच्या प्रवेशाच्या विरोधात आंदोलन तीव्र केले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष  पी एस श्रीधरन पिल्लई यांनी सांगितलं की,

आम्ही  रथ यात्रा 8 नोव्हेंबरपासून कासरगोड इथून शुरू  केली आहे आणि ही यात्रा  13 नोव्हेंबर रोजी पठानमथिट्टा इथं संपणार आहे.

राम मंदिरासाठी विश्व  हिंदू परिषदेची रॅली

अयोध्यातील राम मंदिराच्या बांधकामाच्या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद (व्हीएचपी) पुढील आठवड्यात नागपूर शहरातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये रॅलीचे आयोजन केले आहे. राम मंदिरासाठी शहरातील लोकसभा मतदारसंघांत 13 आणि 14 नोव्हेंबर रोजी बैठकीचे आयोजन केले आहे असंही व्हीएचपीने आपल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.  व्हीएचपी कार्यकारिणी अध्यक्ष आलोक कुमार यांनी शनिवारी नवी दिल्ली येथे सांगितले की, हिंदुत्ववादी संघटनेने सर्व खासदारांच्या मतदारसंघांमध्ये रॅली काढल्या पाहिजेत त्यामुळे सरकारवर राम मंदिरासाठी कायदा करता येईल.

25 नोव्हेंबर रोजी नागपूर, अयोध्या आणि बंगळुरू इथं पहिल्या तीन रॅली होणार आहे. नागपुरमधील 25 नोव्हेंबरच्या मेळाव्याच्या तयारीवर चर्चा करण्यासाठी व्हीएचपीने आरएसएसच्या स्मृती मंदिर येथे शनिवारी  रेशीम बाग इथं बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत आरएसएस, व्हीएचपी, भाजप आणि बजरंग दल कार्यकर्ते उपस्थित होणार आहे.

 

First published: November 13, 2018, 6:44 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading