उदयनराजेंपासून मोदींच्या सभेपर्यंत...या आहेत आजच्या 5 मोठ्या बातम्या

उदयनराजेंपासून मोदींच्या सभेपर्यंत...या आहेत आजच्या 5 मोठ्या बातम्या

आज नरेंद्र मोदी आपल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे

  • Share this:

मोदी फुंकणार लोकसभेचे रणशिंग?

नवी दिल्लीत भाजपच्या कार्यकारणी बैठकीला शुक्रवारी सुरूवात झाली आहे. आज या कार्यकारणीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर समारोप होणार आहे. दुपारी 12 वाजता नरेंद्र मोदी आपल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे.

बेस्ट संपाचा पाचवा दिवस

मुंबईतील बेस्ट बस कर्मचाऱ्यांचा पाचव्या दिवशीही संप सुरूच आहे. काल शुक्रवारीही या संपावर कोणताही तोडगा निघू शकला नाही. मुंबई कोर्टाच्या आदेशानंतरही सरकारकडून कोणताच तोडगा काढण्यात आला नाही. आज पाचव्या दिवशी  विद्युत पुरवठा विभागातीलही कर्मचारी संपात सहभागी होणार आहे. तर दुसरीकडे 11वाजता मुख्यसचिवांसोबत कृती समितीची बैठक होणार आहे.

उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले एकाच व्यासपीठावर

बुलडाण्यात आज 12 जानेवारी रोजी राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सिंदखेड राजामध्ये लाखो जिजाऊ भक्त दाखल होणार आहे. यावेळी  डॉ.अमोल कोल्हे, राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले, संभाजीराजे भोसले, बाबाजीराजे भोसले, जन्मेजय राजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले,  सर्जिकल स्ट्राईकचे मुख्य सेनापती लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या अनेक दिग्गज उपस्थितीत राहणार आहे.

काँग्रेस जनसंघर्ष यात्रा

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा आज भंडारा,चंद्रपूर जिल्ह्यात निघणार आहे. या यात्रेत काँग्रेसचे दिग्गज नेते हजर राहणार आहे.

ठाकरे चित्रपटाचं म्युझिक लाँच

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' हा सिनेमा येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

==============

First published: January 12, 2019, 6:22 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading