गोयल यांच्या पोतडीत काय? या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या

गोयल यांच्या पोतडीत काय? या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या

नरेंद्र मोदी सरकार शुक्रवारी आपला सहावा आणि कार्यकाळातला शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहे.

  • Share this:

केंद्र सरकारचं अंतरिम बजेट सादर होणार

नरेंद्र मोदी सरकार शुक्रवारी आपला सहावा आणि कार्यकाळातला शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. अर्थमंत्री पीयुष गोयल 11 वाजता लोकसभेत 2019चा अर्थसंकल्प सादर करतील. लोकसभेच्या निवडणुका चार महिन्यांवर आल्या असल्यामुळे हा पूर्ण नाही तर हंगामी अर्थसंकल्प असणार आहे.

अण्णा हजारेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण राळेगणसिद्धी सुरू आहे. आजच्या त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. गुरुवारी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि धनंजय मुंडे अण्णांला भेटण्यासाठी जाणार होते. मात्र,नवाब मलिक यांनी अण्णांवर आंदोलन करण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप केला होता, त्यामुळे  अण्णांनी भेट नाकारली.

आंबेडकर –ओवेसी यांची जालन्यात सभा

बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि असाउद्दीन ओवेसी यांची जालण्यात आज चार वाजत  जाहीर सभा होणार आहे. परंतु, या सभेला मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. ओवेसींनी भाषण करू नये, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

नवीन डीटीएच नियम लागू

आज  1 फेब्रुवारीपासून प्रेक्षकांना आवडीचे चॅनल निवडता येणार आहे आणि त्याच  चॅनलसाठीच शुल्क भरावा लागणार आहे. ट्रायनं ग्राहकांच्या हिताचा या नियम लागू केला आहे. आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

मुख्यमंत्र्यांची दिल्लीवारी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हरियाणाच्या दौऱ्यावर जाणार आहे.  सूरजकुंड महोत्सवाला ते हजेरी लावणार आहे. त्यानंतर ते दिल्लीत जाणार आहे. दिल्लीवारीमुळे सेना आणि भाजपच्या युतीच्या चर्चेला पुन्हा जोरा आला आहे.

First published: February 1, 2019, 7:07 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading