मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

...अन् तिला वाचवण्यासाठी सख्ख्या भावांनी लावली जीवाची बाजी; तिघांचाही पाण्यात बु़डून मृत्यू

...अन् तिला वाचवण्यासाठी सख्ख्या भावांनी लावली जीवाची बाजी; तिघांचाही पाण्यात बु़डून मृत्यू

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Solapur News: सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी येथील एका दर्गा परिसरातील तलावात बुडून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

  • Published by:  News18 Desk

सोलापूर, 08 ऑगस्ट: सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बोरामणी (Boramani) येथील एका दर्गा परिसरातील तलावात बुडून (three drowned into lake) तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू (death) झाल्याची घटना समोर आली आहे. संबंधित तिघे जण एकाच गावातील रहिवासी असल्यानं गावात शोककळा पसरली आहे. मृत तिघेजण आपल्या नातेवाईकांसोबत बोरामणी येथील दावल मलिक दर्गा येथे आले होते. दरम्यान दर्गा परिसरातील एका तलावात तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

रिहाना तौफिक पिरजादे (वय -35), यासिन हारुण शेख (वय-35) आणि सलीम हारुण शेख (वय-42) मृत झालेल्या तिघांची नावं आहेत. संबंधित तिघेही विडी घरकुल कुंभारी येथील रहिवासी आहेत. यामध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. पाण्याचा अंदाज न आल्यानं हा अपघात घडला आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

हेही वाचा-दारूसाठी धान्य विकणाऱ्या मुलाला आईनं रोखलं; लेकानं माऊलीला दिल्या नरक यातना

संबंधित तिघेजण आपापल्या नातेवाईकांसोबत सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी येथील दावल मलिक दर्ग्यात आले होते. सर्व धार्मिक विधी उरकल्यानंतर, घरी परत जात असताना, तिघेही दर्गा परिसरातील वन विभागाच्या क्षेत्रात असणाऱ्या तलावाजवळ आले. यावेळी रिहाना ही पाण्यात उतरली. पण पाण्याचा अंदाज न आल्यानं ती तलावात बुडू लागली. गावातील एक महिला पाण्यात बुडत असल्याचं दोघा भावंडांना दिसलं.

हेही वाचा-GFची हत्या करुन घरातच लपवली Dead Body, 7 महिने तिच्या मृतदेहासह केलं वास्तव्य

त्यामुळे दोघे सख्खे भाऊ रिहाना यांना वाचवण्यासाठी तलावात उतरले. त्यांनी आपला जीव धोक्यात घालून रिहाना यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण दुर्दैवानं या तिघांचाही तलावात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेनं  दर्गा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच एकाच गावातील तिघांचा अशा पद्धतीनं अंत झाल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

First published:

Tags: Crime news, Solapur