मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मला हरवण्यासाठी पवारांना बीडमध्ये यावं लागतंय,पंकजा मुंडेंचं टीकास्त्र

मला हरवण्यासाठी पवारांना बीडमध्ये यावं लागतंय,पंकजा मुंडेंचं टीकास्त्र

जिल्ह्याचा विकास करायला पंधरा वर्षांपेक्षा जास्त कालावधी हा यांच्याकडे होता मग का केला नाही असा सवाल पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीला केलाय.

शशी केवडकर, 02 सप्टेंबर : गोपीनाथ मुंडे यांच्या मुलीला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांनी बीड इथं येऊन चक्क जाहीर सभा घ्यावी लागते हेच आमचं यश असून ज्या पक्षात नेत्या नेत्यात एकी नाही त्यांनी काय आम्हाला टक्कर द्यावी अशी खिल्ली उडवत मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या विजयी संकल्प मेळाव्यावर तोफ डागली.

बीड जिल्ह्यातील धारूर येथील एका सभेत पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्याचा समाचार घेतला. स्व.गोपीनाथ मुंडे यांचा पराजय करण्यासाठी अख्ख तत्कालीन मंत्रीमंडळ जिल्ह्यात तळ ठोकून होतं. परंतु झालं काय तर मुंडेसाहेब हे लाखोच्या मताधिक्याने निवडून आले अशीच स्थिती ही यावेळी ही कायम राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

बीड इथं राष्ट्रवादी काँग्रेसचा कालच विजय संकल्प मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात सरकारच्या कारभारावर कडाडून टीका पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. त्यास पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलंय.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अवस्था खूप कठीण झाली असून पक्षातील च नेते एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहे. त्यामुळे पवारांनी अगोदर पक्षाकडं लक्ष द्यावं. मग जिल्ह्याकडे असा उपरोधिक सल्ला पंकजा मुंडे यांनी दिलाय.

जिल्ह्याचा विकास करायला पंधरा वर्षांपेक्षा जास्त कालावधी हा यांच्याकडे होता मग का केला नाही असा सवाल पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीला केलाय.

आगामी लोकसभा निवडणुकीचे आता पडघम हे बीड जिल्ह्यात चांगलेच गाजू लागले असून राष्ट्रवादीमधील गटबाजी आणि भाजपमधील 'एकला चलो रे' वृत्ती यातून कमळ फुलणार की घडीचे काटे धावणार हे येणारा काळचं सांगेल.

==============================================================

VIDEO: लोकलमध्ये दरवाजात उभ्या असलेल्या तरुणीचा तोल गेला, मात्र...!

First published:

Tags: NCP, पंकजा मुंडे, भाजप, राष्ट्रवादी