मुंबई, 5 जुलै: खेकडे एकमेकांचे पाय खेचतात अशी म्हणायची एक पद्धत आहे मात्र आता हे पाय खेचणारे खेकडे धरणही फोडत असल्याचा अजब दावा केला आहे. जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनीच खेकड्यांमुळे धरण फुटल्याचा दावा केला. त्यांच्या या दाव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेनं चक्क पोलीस ठाण्यात पोलिसांना खेकडे देत आंदोलन केलं आहे. याच आरोपी खेकड्यांना तुरुंगात टाका अशी मागणी विरोधकांनी केली आहे. आता पोलीस खरंच खेकड्यांना तुरूंगात टाकणार की खेकड्याची वृत्ती असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.