बीड, 16 ऑगस्ट : 'जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा (maratha reservation) विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत गळ्यात हार घालणार नाही. ओबीसीचे राजकीय आरक्षण (obc reservation) पूर्ववत होत नाही तोपर्यंत मला कुणी फेटा बांधायचा नाही' अशी घोषणाच भाजपच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी (pankaja munde) केली. तसंच, 'माझ्या दुसऱ्या पक्षांमध्ये फार चांगले संबंध आहेत. मला वाटतच नाही की मुख्यमंत्री बदलले आहेत, असं म्हणत पंकजा मुंडेंनी देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांचं नाव न घेता टोमणा हाणला.
बीडमधील भाजप समर्थ बूथ अभियानाच्या कार्यक्रम आज पार पडला. यावेळी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या लढाईसाठी पंकजा मुंडेंनी हाक दिली.
'बीडमध्ये एक सुंदर उदाहरण घालून देऊ आरक्षण लढा वेगळ्या मार्गाने उभा करूया. 'जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत गळ्यात हार घालणार नाही. ओबीसीचे राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही तोपर्यंत मला कुणी फेटा बांधायचा नाही,' अशी घोषणाही मुंडेंनी केली.
#बीड - जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत गळ्यात हार घालणार नाही, पंकजा मुंडेंची घोषणा pic.twitter.com/a2hD5NRdH7
— News18Lokmat (@News18lokmat) August 16, 2021
तसंच, ज्याला खुर्चीवर बसायचं आहे, त्याला आपण आपआपसात भांडून मरावं असं वाटतं पण छत्रपती शिवाजी महाराज यांनी असं केलं नाही, त्यांनी सोशल इंजिनियअरिंग केलं. गोपीनाथ मुंडे यांना विचारलं असता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव समोर ठेऊन राजकारण करत असल्याचं सांगितलं होतं' असंही पंकजा मुंडे म्हणाल्यात.
VIDEO - अरे हिला झालंय तरी काय? पाठवणीवेळी नवरीचा अवतार पाहून वऱ्हाडी शॉक
'माझ्या दुसऱ्या पक्षांमध्ये फार चांगले संबंध आहेत मला वाटतंच नाही की मुख्यमंत्री बदलले आहेत. वाटतच नाही मला कळलं का, माझे पक्षाविषयी माझे समर्पन आहे, माझ्या मनात पक्षाविषयी सन्मान आहे. तसंच माझे दुसऱ्या पक्षात खूप चांगले संबंध आहेत गोपीनाथ गडावर भागवत कराड आले म्हणून मला विचारलं, तेव्हा मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे येऊन गेले, छगन भुजबळ मंत्री झाल्यावर आले होते, दोन्ही छत्रपती येऊन गेले अमित शहा येऊन गेले भय्यू महाराज, नामदेव शास्त्री महाराज येऊन गेले. सगळं घेऊन गेले गोपीनाथ गड ही लोकनेते मुंडे साहेबांची समाधीस्थळ आहे' असंही पंकजा म्हणाल्यात.
अजब अपघात! रेल्वे इंजिनानं सोडला ट्रॅक, धडधडत आलं वर्दळीच्या रस्त्यावर
'जिल्हा नियोजन बैठकीत अभियंता का येत नाही तुम्ही अभियंत्याला विकले गेले तुम्ही अधिकारी आणता, माझ्या वेळी अवैध धंदे होत होते का? 1/ 2 टक्के होत असेल आता तर माझ्या मतदारसंघांमध्ये एवढे नंबर 2 चे धंदे झालेत, पाहिजे तेवढ्या हातभट्ट्या लावा पाहिजे तेवढी दारूचे दुकान टाका, मटके तर उघडून ठेवले, जुगार वाढला आहे, जिल्ह्यामध्ये कशाला लोक पोलिसांना घाबरतील, कशाला मोठे अधिकारी पालकमंत्र्याला घाबरतील. कारण, प्रतिमा आणि प्रतिष्ठा आणि त्या पदाला ती मिळविण्याची लायकी कुणाकडे असते आणि कुणाकडे नसते, असं म्हणत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंचं नाव न घेता टोला लगावला.
पंकजा मुंडेंनी सांगितला किस्सा
'एकदा भाषण संपल्यावर मी गाडी लवकर काढा वेळ झाला, असे सांगताना घड्याळ दाखवलं. तेंव्हाचा फोटो महाराष्ट्रातील 25 राष्ट्रवादीचे उमेदवार माझा फोटो दाखवून पंकजा मुंडेंनी घड्याळाला मतदान करा, असं सांगितलं होतं म्हणून राष्ट्रवादीसोबत आहे, काहीतरी असेल ना? असं म्हणत सूचक वक्तव्यही त्यांनी केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed, BJP, Pankaja munde