VIDEO: लग्नाचं सर्टिफिकेट आणलंय मला विष दे! दुकानदार काय म्हणाला...

VIDEO: लग्नाचं सर्टिफिकेट आणलंय मला विष दे! दुकानदार काय म्हणाला...

विवाह नोंदणी प्रमाणपत्र घेऊन विष मेडिकलमध्ये विष मागायला गेला तरूण पुढे काय झालं पाहा.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 सप्टेंबर: सध्या टिक टॉक व्हिडिओवरुन अनेक लोक ट्रोल होताना दिसतात. टिकटिकॉ हा एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्यावर 30 सेकंदाचे मनोरंजनासाठी किंवा फनी व्हिडिओ तयार केले जातात. या अॅपच्या माध्यमातून अनेक लोक प्रसिद्ध झाले आहेत. टिकटॉकची क्रेझ तर लहान मुलांपासून तरुण आणि वयोवृद्धांपर्यंत सर्वांमध्ये आहे. सध्या सोशल मीडियावर टिकटॉकचा एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या टिकटॉक व्हिडिओमध्ये एक तरुण मेडिकल स्टोरमध्ये विष मागतो. दुकानदार सांगतो डॉक्टरचं प्रिस्क्रिपशन दाखवल्याशिवाय काही मिळणार नाही. त्यावर तरुण त्याला स्वत:च्या लग्नाचं सर्टफिकेट दाखवतो. त्यावर दुकानदार म्हणतो, रुलाएगा क्या? अब बोल जहर की छोटी बोतल देनी है या बडी?

हा टिकटॉवरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांनी तुफान लाईक्स आणि कमेन्ट केल्या आहेत. बऱ्याचदा टिकटॉक व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळे चॅलेंजही दिले जातात.

महालासारखं आहे युनिव्हर्सल बॉसचं घर, स्ट्रिप क्लबपासून पोल डान्सच्या सुविधा

वायरल झाली होती सुपर ग्लू चॅलेंज

टिकटॉक (TikTok)वर पहिल्यांदाच अनोखं चॅलेंज देण्यात आलं आणि त्या चॅलेंजनंतर वेगवेगळ्या पद्धतीचे चॅलेंज देणारे व्हिडिओही ट्रेन्ड झाले. त्यापैकी सगळ्यात प्रसिद्ध आणि सोशल मीडियावरील गाजलेलं चॅलेंज म्हणजे सुपर ग्लू (Super-gluing). या चॅलेंजमध्ये आयलॅश ग्लू किंवा नेल ग्लू अर्थात गम लावायचा आणि त्याचा व्हिडिओ तयार करायचा. समाचार पोर्टल डेज्डडिजिटल पोर्टलच्या अहवालानुसार टिकटॉकवर या चॅलेंजची सुरूवात चोलेहैमक4 नावाच्या एका युझरने केली होती. त्यानंतर एकामागोमाग एक व्हिडिओ ट्रेन्ड होत गेले.

या युझरने आपल्या ओठांना गम लावून तो व्हिडिओ टिकटॉकवर शेअर केला. ह्यामुळे ओठांचा आकार बदलला होता.तर अनेकांच्या भन्नाट कमेंट्सही आल्या होत्या. हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओला आतापर्यंत 70 लाख लोकांनी पाहिल्याची माहिती मिळत आहे. तर 9 हजारहून अधिक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. सोशल मीडियावर सुपर ग्लू चलेंजनं धुमाकूळ घातला आहे.

VIDEO: विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2019 03:02 PM IST

ताज्या बातम्या