'आता लय गुलीगत बेकार वाटतंय', टिकटॉकस्टार सुरजला कोसळलं रडू

'आता लय गुलीगत बेकार वाटतंय', टिकटॉकस्टार सुरजला कोसळलं रडू

आज वर्षातला पहिला असा दिवस आहे, ज्या दिवशी मी टिकटॉकवर व्हिडिओ तयार केला नाही.

  • Share this:

बारामती, 02 जुलै : टिकटॉकवर अखेर भारतात बंदी आली आहे. पण, या टिकटॉकमुळे अनेक स्टार उदयास आले होते. अगदी ग्रामीण भागातून अनेकजण रातोरात स्टार झाले. पण, टिकटॉक बंद झाल्यामुळे या टिकटॉकस्टार्सवर शोककळा पसरली आहे. असाच एक टिकटॉकस्टार 'गुलीगत' नाराज झाला आहे. त्याचं नाव आहे सुरज चव्हाण.

'लललाला.. एस क्यू आर क्यू झेड क्यू.. 'बँड इज बँड...बुक्कीत टेंगुळ गुलीगत...' असं म्हणून भल्याभल्यांना खदखदून हसवणारा सुरज चव्हाण अर्थात गुलीगत कमालीचा नाराज झाला आहे. टिकटॉक बंद झाल्याची घोषणा झाली आणि तिकडे सुरजला रडू कोसळलं होतं.

'आता मला करमत नाही, पहिले खूप मजा यायची. टिकटॉक स्टार असल्यामुळे अनेक जण दुकान उद्घाटनाला तरी बोलवायची, लोकं भेटायला यायची. पण, आता कुणी बोलावत नाही. एकदम सगळं कसं थांबून गेलंय. आता लय बेकार वाटतंय' अशी व्यथाच सुरजने आपल्या स्टाईलमध्ये मांडली.

बेपत्ता झालेल्या प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या, बुलडाण्यात खळबळ

सुरज चव्हाण हा पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोरटी मुर्वे गावचा रहिवासी आहे. गुलीगत अर्थात सुरजचे टीकटॉकवर थोडे थोडके नाहीतर तब्बल 15 लाख फॉलोवर्स होते. सुरजचं शिक्षण जेमतेम 8 पर्यंत झालं आहे. घरची परिस्थिती अत्यंत गरीब असल्यामुळे त्याला पुढे शिक्षण घेता आले नाही. त्याला 5 बहिणी असून त्यापैकी चार बहिणीची लग्न झाली आहे.

सूरज सांगतो की, 'टिकटॉक अचानक बंद झाल्यामुळे त्यादिवशी मला रडूच कोसळले. आज वर्षातला पहिला असा दिवस आहे, ज्या दिवशी मी टिकटॉकवर व्हिडिओ तयार केला नाही. दररोज 50 ते 100 व्हिडिओ मी तयार करायचो. पण आता अचानक सगळं काही थांबून गेलं. दिवसाला यातून 1000 रुपये मिळायचे. आता ते पण कायमचं बंद झालं आहे.'

टीकटॉक बंद झाल्यानंतर पुढे काय करावे असा प्रश्न सुरजला पडला आहे. सुरजची घरची परिस्थिती गरीब असल्यामुळे टिकटॉक हेच कमाईचे साधण बनले होते. पण, आता टिकटॉक बंद झाल्यामुळे सुरजवर बेरोजगारीची वेळ आली आहे. परंतु, बुक्तीत टेंगुळ म्हणत सूरजने युट्यूबवर चॅनेल सुरू करण्याचा इरादा पक्का केला आहे.

 

धुळेकर टिकटॉकस्टारच्या दोन्ही बायका ढसाढसा रडल्या

दरम्यान, धुळ्यात राहणारे दिनेश पवार आपल्या दोन बायकांसह टिकटॉक स्टार झाले. पवार आणि त्याच्या दोन पत्नी 90 च्या दशकातील बॉलीवूड गाण्यांवर डान्स करायचे. या व्हिडीओमुळे त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली. शिवाय त्यांनी 30 लाख रुपयांची कमाई केली. टिकटॉकवर बंदीनंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी आपण आता उद्धवस्त झाल्याचं म्हटलं आहे.

राज्यात कम्युनिटी ट्रान्समिशनमुळे कडक लॉकडाऊन? आरोग्यमंत्र्यांनी केला खुलासा

'आम्ही आता उद्धवस्त झालो, मात्र अशी परिस्थिती फक्त आमचीच नाही हे आम्हाला समजलं. माझ्या दोन्ही पत्नींनी ही बातमी पाहिली आणि त्या रडूच लागल्या. आमच्यासारख्या लाखो लोकांना असंच दु:ख झालं असणार. आता आम्ही युट्युबर आमचे व्हिडिओ बनवण्याचा निर्णय घेतला आहे"

संकलन, संपादन - सचिन साळवे

First published: July 2, 2020, 3:23 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading