मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ताडोबात डॉक्टरवर हल्ला करणाऱ्या वाघिणीचा अचानक मृत्यू; वाघिणीच्या अंगावर जखमा

ताडोबात डॉक्टरवर हल्ला करणाऱ्या वाघिणीचा अचानक मृत्यू; वाघिणीच्या अंगावर जखमा

Tigress found dead in Tadoba: ताडोबा अभयारण्यात वाघिण मृतावस्थेत आढळून आली आहे. याच वाघिणीने दोन दिवसांपूर्वी डॉक्टरवर हल्ला केला होता.

  • Published by:  Sunil Desale

हैदर शेख, प्रतिनिधी

चंद्रपूर, 5 जून: प्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात (Tadoba Tiger Reserve) एक वाघिण मृतावस्थेत आढळून आली (Tigress found dead) आहे. या वाघिणीने दोन दिवसांपूर्वी एका पशुवैद्यकीय डॉक्टरांवर हल्ला सुद्धा केला होता. ज्या ठिकाणी या वाघिणीने डॉक्टरांवर हल्ला केला होता त्याच ठिकाणी वाघिण मृतावस्थेत आढळून आली आहे. तसेच या वाघिणीच्या अंगावर काही जखमा सुद्धा आढळून आल्या आहेत.

गुरुवारी म्हणजेच 3 जून 2021 रोजी ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यक अधिकारी डॉ रविकांत खोब्रागडे यांच्यावर अचानक हल्ला केला होता. या हल्ल्यात डॉ. रविकांत खोब्रागडे हे जखमी झाले होते. मात्र, आता दोन दिवसांनी याच वाघिणीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या वाघिणीचं वय अंदाजे 3 ते 4 वर्षे होतं. वाघिणीच्या शरीरावर जखमा आढळून आल्या आहेत. एखाद्या वन्यप्राण्यासोबत झालेल्या झुंझीत जखमी झाल्यानंतर वाघिणीचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

नागपुरात 4 वर्षांच्या मादी बिबट्यासह 4 महिन्याच्या पिल्लाचाही मृत्यू

काय घडलं होतं त्या दिवशी

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील डोनी गावालगतच्या जंगलात ही वाघिण निपचित अवस्थेत पडून असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. या नंतर वन विभागाने तिच्यावर उपचार केले आणि गेल्या 2 दिवसांपासून प्रकल्पात तिच्यावर पथक पाळत ठेवून होते. गुरुवारी सकाळी 7.30 वाजता दरम्यान वाघाची प्रत्यक्ष स्थिती बघण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी आणि पथक गेले असता वाघिणीने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला.

स्वतःचा बचाव करताना डॉ खोब्रागडे खाली पडले. तेव्हा वाघिणीने त्यांचे दोन्ही पाय पकडले. जबड्यात बोटं सापडल्यानं एक बोट तुटलं तर दुसऱ्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. सोबतच्या लोकांनी जोरदार आरडाओरडा केल्यावर वाघिण पळाली.

First published:

Tags: Maharashtra