ट्रकची धडक लागल्याने अमरावती हायवेवर वाघाचा मृत्यू

ट्रकची धडक लागल्याने  अमरावती हायवेवर  वाघाचा मृत्यू

. वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्यातील बाजीराव हा वाघ असून तो रस्ता क्रास करताना त्याला ट्रकची धडक लागली त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

  • Share this:

 30 डिसेंबर:  नागपूर अमरावती हायवेवर सातनवरी येथे एका पुर्ण वाढ   झालेल्या  तीन ते चार वर्षे वयाच्या बोर अभयारण्यातील बाजीराव या वाघाचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला आहे.

कोंढाळी जवळ नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावर बाजारगांव नजीक अज्ञात ट्रकच्या धडकेत सायं 7 वाजता बोर अभयारण्यातील या पट्टेदार वाघाचा मृत्यु झाला आहे. वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्यातील बाजीराव हा वाघ असून तो रस्ता क्रास करताना त्याला ट्रकची धडक लागली त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

या वर्षी राज्यात २१ वाघांचा विविध कारणांनी मृत्यू झाला तर देशात ११२ वाघ मृत्यूमुखी पडले. या वाघाच्या मृत्यूमुळे व्याघ्रप्रेमींमध्ये नाराजी आहे. बाजारगांव नजीक कोंढाळी नागपूर लेन वर महामार्ग ओलांडत असताना या 3 ते 4 वर्ष वयाच्या मोठ्या पट्टेदार वाघाला अज्ञात ट्रकने जबर धडक दिली आणि ट्रक चालकाने कारवाईची भीती होईल म्हणून पळ काढला.

बाजीराव हा वाघ 240 से मी लांब व जवळपास 200 किलो वजनी होता.कोंढाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी फरीद आझमी हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्यांनी मृत वाघाचा पंचनामा केले मृत वाघाचे शव विच्छेदन नागपूर येथे करण्यात येणार आहे.

वनविभागाने दिलेल्या माहितीवरुन सायंकाळी 7 वाजता दरम्यान नीमजी कलमेश्वर रेंजमधून हा वाघ बोर अभयरण्याकडे जात होता. हा वाघ नेहमी महामार्ग ओलंडत असे परंतु आज महामार्ग ओलांतना 200 kg वजन असलेल्या वाघाला आज धड़क बसल्याने त्याचा मृत्यू झाला. याच परिसरात गेल्या महिन्यात   एका वाघिणीचा शेतात लावलेल्या वीजेच्या तारात अडकून मृत्यू झाला होता.

केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री आणि प्राणीप्रेमी मनेका गांधी यांनी वाघाच्या अपघाती मृत्यूची दखल घेत दुःख व्यक्त केले.

First published: December 30, 2017, 1:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading