आधी डबा पळवला आता रिसेप्शनला, वाघोबाचं चालंय तरी काय ?

आधी डबा पळवला आता रिसेप्शनला, वाघोबाचं चालंय तरी काय ?

मध्यप्रदेशातल्या बालाघाटमध्ये वाघोबा चक्क लग्नाच्या रिसेप्शनमध्ये शिरले होते.

  • Share this:

14 डिसेंबर : वाघोबांना झालंय काय असा प्रश्न आता पडलाय लागलाय बरं का?, गेल्याच आठवड्यात ताडोबा अभयारण्यात वाघोबांनी मजुराचा डबा पळवला होता. तर दुसऱ्या एका घटनेत मध्यप्रदेशातल्या बालाघाटमध्ये वाघोबा चक्क लग्नाच्या रिसेप्शनमध्ये शिरले होते.

भंडारा जिल्ह्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील वाघाने मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये एका लग्नाच्या रिसेप्शनमध्ये घुसून थरकाप उडवला. पूर्ण वाढ झालेल्या या वाघाने यापुर्वीचं भंडारा जिल्ह्यात एका महिलेवर हल्ला करून जखमी केलं होतं. पण हा वाघ मध्य प्रदेशातील बालाघाट परिसरात रस्त्यांवरून चालतांना अनेकांनी पाहिलं.

एवढंच नव्हे तर या वाघाने मासुलखापा गावातील लग्नाच्य़ा पार्टीत घुसला आणि थरकाप उडवला. लोकांनी या वाघाला पाहताच मोठा गोंधळ केला आणि लोक सैरवैर पळू लागले.   लोकांनी आरडाओरडा केला म्हटल्यावर वाघोबा थांबले नाहीत. वाघोबांनी लगेचच मंडपातून पळ काढला. पण वाघाला पाहिल्यानं रिसेप्शनला आलेल्या वऱ्हाड्यांची मात्र चांगलीच तंतरली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 14, 2017 11:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading