हैदर शेख, प्रतिनिधी
चंद्रपूर, 20 नोव्हेंबर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात (tadoba andhari tiger reserve) मोठी घटना घडली आहे. एका महिला वनरक्षकावर वाघाने हल्ला (tiger attack on woman forest ranger) केला आहे. या हल्ल्यात महिला वनरक्षकाचा मृत्यू झाला आहे. मृतक महिला वनरक्षकाचे नाव स्वाती ढुमणे असे आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. व्याघ्रगणनेची पूर्वतयारी करण्यासाठी कोअर क्षेत्रात स्वाती ढुमणे गेल्या होत्या. प्रकल्पाच्या कोलारा वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. 97 मध्ये ही घटना घडली आहे. (Woman forest ranger Swati Dhumane died in tiger attack)
काय घडलं नेमकं?
43 वर्षीय स्वाती ढुमणे व्याघ्रगणनेची पूर्वतयारी करण्यासाठी कोअर क्षेत्रात गेल्या होत्या. सकाळच्या सुमारास त्या ताडोबाच्या कोलारा वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. 97 येथे पोहोचल्या त्यावेळी वाघाने हल्ला केला. स्वाती ढुमणे यांच्या सोबत 4 वनमजूर सुद्धा होते. त्यांनी वाघाला हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाघाने स्वाती यांना ओढून दाट जंगलात नेले.
घनदाट जंगलात आढळला मृतदेह
यानंतर घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. तातडीने अधिक कुमक बोलावली गेली. ही माहिती मिळताच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आसपासच्या परिसरात शोध मोहिम हाती घेतली. वरिष्ठ अधिकारी -अधिक कुमक आल्यावर शोधमोहिमेत मृतदेह सापडला. सध्या व्याघ्रगणनेसाठी देशातील सर्वच जंगलात वनविभागाच्या वतीने पूर्वतयारी केली जात आहे.
वाचा : वाघाच्या हल्ल्यात दोन ग्रामस्थांचा मृत्यू, गावात भीतीचे वातावरण
वाघामुळे मार्ग बदलला पण...
सध्या व्याघ्रगणनेसाठी देशातील सर्वच जंगलात वनविभागाच्या वतीने Transect line survey चे काम केले जात आहे. सकाळी 7 वाजता कोलारा भागात याच कामासाठी पथक पोचले होते. मात्र 4 किमी आत गेल्यावर रस्त्यावर असलेल्या वाघामुळे पथकाने मार्ग बदलला. मात्र वाघाने मजुरांमागून चालत असलेल्या स्वाती यांना लक्ष्य केले.
वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या पश्चात पती व मुलगा असा परिवार आहे. वरीष्ठ वनाधिकारी कोलारा येथे दाखल झाले असून पीडित परिवाराला योग्य ती मदत दिली जात आहे. ताडोबाच्या कोअर भागातील Transect line survey चे काम तात्पुरत्या स्वरूपात थांबविण्यात आले आहे.
झुडपात दडून बसलेल्या वाघाचा गाईवर हल्ला, ताडोबातील LIVE VIDEO
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमावर्ती भागात गाईवर वाघाने हल्ला केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. चंद्रपूर शहरालगत पद्मापूर ते मोहर्ली मार्गावर ही घटना घडली. या मार्गावरून कारने ताडोबाकडे जाणाऱ्या एका कुटुंबाने ही दृश्ये आपल्या कॅमेर्यात कैद केली आहेत. अत्यंत चपळाईने वाघाने गाईला जखमी करत शिकार साधल्याचे व्हिडीओत दिसत आहे.
रस्त्याच्या अगदी कडेला झालेल्या या थराराने ताडोबाकडे निघाले पर्यटक क्षणभर थबकलेच. जिल्ह्यातील वनक्षेत्रालगत असलेल्या गावांच्या सीमावर्ती भागात कित्येकदा अशा घटना घडतात. मात्र हा थरार लाईव्ह कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत असून त्याची चर्चाही होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chandrapur, Tiger attack