वाघ आणि सिंह एकत्र,आम्हाला उंदरांची भीती नाही, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

वाघ आणि सिंह एकत्र,आम्हाला उंदरांची भीती नाही, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

आम्हाला उंदरांना पकडण्यासाठी डोंगर पोखरण्याची गरज नाही, आमच्या वाटेत उंदीर येतील आम्ही त्याचा पराभव करू कारण वाघ आणि सिंह एकत्र असल्यानं उंदरांची काळजी करण्याची गरज नाही.

  • Share this:

मुंबई, 28 मार्च: विधिमंडळाच्या अधिवेशनात यावेळी खरी रंगत आली ती एकनाथ खडसेंच्या उंदीर पुराणाने. अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी केलेल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाचा शेवट उंदीर पुराणाने केला. मुख्यमंत्री म्हणाले उंदीर प्रकरणावरून विरोधीपक्ष नेत्यांनी जी कथा रंगवली ती मनोरंजक आणि कल्पक होती त्यामुळं ते उत्तम लेखक, पटकथा लेखक होऊ शकतात. आम्हाला उंदरांना पकडण्यासाठी डोंगर पोखरण्याची गरज नाही, आमच्या वाटेत उंदीर येतील आम्ही त्याचा पराभव करू कारण वाघ आणि सिंह एकत्र असल्यानं उंदरांची काळजी करण्याची गरज नाही. कितीही उंदीर एकत्र आले तरी 2019 ची निवडणूक आम्हीच जिंकणार असं सांगत मुख्यमंत्र्यांनी भाषणाचा शेवट केला.

 राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला

उंदरांची संख्या बघून वाघाची मांजर झालीय, ही मांजर त्यांना उंदरांना पकडायला जाते पण त्यांना दुधाचं ताट दाखवली की ती फक्त म्याव म्याव करते, असा सणसणीत टोला राधाकृष्ण विखे पाटलांनी शिवसेनेला हाणला आहे.

काय म्हणाले जयंत पाटील

वेळीच काळजी घेतली नाही तर 2019 मध्ये हेच उंदीर तुमचं सिंहासन पोखरतील असा टोला राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी लगावला.

First published: March 28, 2018, 7:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading