काळजी घ्या! पुण्यासह या 10 जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार

काळजी घ्या! पुण्यासह या 10 जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार

पुढील 3 ते 4 तासांमध्ये पुण्यासह महाराष्ट्रातील इतर 10 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 21 ऑक्टोबर : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. अजून पुढचे काही दिवस महाराष्ट्राला पावसाचा तडाखा सहन करावा लागणार आहे. अशातच पुढील 3 ते 4 तासांमध्ये पुण्यासह महाराष्ट्रातील इतर 10 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

'रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तासांध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळेल. त्यानंतर हीच स्थिती ठाणे, नाशिक, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, नंदुरबार, जळगाव आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे,' असा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून वर्तवण्यात आला आहे.

पावसाच्या तडाख्याने शेतीचं तर मोठं नुकसान झालंच आहे, मात्र त्याशिवाय काही ठिकाणी जीवितहानीच्याही दुर्दैवी घटना घडल्या आहेत. कुठे पाण्यात वाहून गेल्यामुळे तर कुठे वीज कोसळल्यामुळे नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.

त्यामुळे ज्या परिसरात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तेथील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, असं आवाहन करण्यात येत आहे.

Published by: Akshay Shitole
First published: October 21, 2020, 5:20 PM IST

ताज्या बातम्या