Home /News /maharashtra /

नवजात बाळाला दिले विहिरीत फेकून, गावात चर्चा झाली अन् धक्कादायक कारण आले समोर

नवजात बाळाला दिले विहिरीत फेकून, गावात चर्चा झाली अन् धक्कादायक कारण आले समोर

विहिरीची पाहणी केल्यानंतर नवजात बाळाला बाहेर काढण्यात आले. पण नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झाले.

गडचिरोली, 09 ऑगस्ट :  गडचिरोली (gadchiroli) जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात एका कुमारी मातेने प्रेमप्रकरणात जन्मलेल्या एका नवजात बालकाला  (new born baby) शासकीय विहिरीत (Well) फेकून दिल्याची मन हेलावून टाकणारी घटना उघड झाली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. कुरखेडा (kurkheda) तालुक्यातील वाकडी गावात ही घटना घडली आहे. वाकडी गावातील काही मुले सार्वजनिक विहिरीच्या आवारात खेळत होती. दरम्यान मुलांना विहिरीच्या पाण्यात काहीतरी तरंगताना दिसले. त्यामुळे मुलांना गावातील लोकांना याबद्दल सांगितले. गावकऱ्यांनी जेव्हा विहिरीकडे धाव घेतली आणि पाहणी केली असता सर्वांना धक्का बसला. बर्थ डे रॅली काढली अन् तलवारही बाळगली, आमदार अबू आझमींवर गुन्हा दाखल गावकऱ्यांनी तातडीने याबद्दलची माहिती पोलीस स्टेशनला कळवली. कुरखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीची पाहणी केल्यानंतर नवजात बाळाला बाहेर काढण्यात आले. पण नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झाले.  नवजात मृत मुलाला विहिरीतून बाहेर काढल्यानंतर तपास सुरू केला. गावात चौकशी केल्यानंतर एका कुमारी मातेने हे कृत्य केल्याचं समोर आलं. या मातेनं त्या नवजात मुलाला प्रेम प्रकरणातून जन्म दिला होता. पण, बाळ नकोसे अशल्यामुळे विहिरीत फेकून दिल्याची कबुली तरुणीनं दिली. पोलिसांनी या प्रकरणी या तरुणीला अटक केली असून अधिक तपास करत आहे. दोन दिवसांपूर्वी विरारमध्येही घडली अशीच घटना दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच  मुंबईजवळील विरारमध्ये सुद्धा एका नवजात बाळाला (new born baby) इमारतीच्या टेरेसवरून खाली फेकण्यात आल्याची घटना घडली होती.  विरार पश्चिमेच्या यशवंत नगर परिसरातील तुलिप सोसायटीमध्ये ही घटना घडली होती. एका अज्ञात व्यक्तीचे इमारतीच्या टेरेसवरून नुकताच जन्मलेल्या स्री जातीच्या बाळाला फेकुन दिले होते. Delta Variant ची मुंबई-ठाण्यात धडक, राज्यातील रुग्ण संख्या पोहोचली 45 वर सोसायटीत राहणाऱ्या अन्य काही रहिवाशांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी त्वरित बालिकेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण रुग्णालयात उपचार सुरू असतानाच, त्या निष्पाप चिमुकलीनं अखेरचा श्वास घेतला. एका १५ वर्षीय अल्पवयीन मातेनं हे कृत्य केल्याचं तपासातून समोर आलं. या निर्दयी मातेला पोलिसांनी अटक केली आहे.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या