छत्री फेकली, धावत आला अन् पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या महिलेचा वाचवला जीव; घटनेचा थरारक VIDEO

VIRAL VIDEO: बुलडाण्यातील एका तरुणानं आपला जीव धोक्यात घालत पुराच्या पाण्यात वाहत जाणाऱ्या महिलेचा जीव वाचवला आहे. या घटनेचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

VIRAL VIDEO: बुलडाण्यातील एका तरुणानं आपला जीव धोक्यात घालत पुराच्या पाण्यात वाहत जाणाऱ्या महिलेचा जीव वाचवला आहे. या घटनेचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • Share this:
    बुलडाणा, 18 जून: काल राज्यातील विविध भागात मान्सूनच्या पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव आणि चिखली तालुक्यालाही पावसानं झोडपून काढलं आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक छोट्या-मोठ्या नदी -नाल्यांना पूर आला आहे. खामगाव तालुक्यातील अशाच एका नाल्याला आलेल्या पुरातून रस्ता ओलांडणं एका महिलेच्या चांगलंच अंगलट आलं होतं. पण दैव बलवत्तर म्हणून ही महिला पुराच्या पाण्यात वाहून जाताना थोडक्यात बचावली आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे महिलेचा जीव वाचला आहे. येथील एका तरुणानं प्रसंगावधान दाखवत हातातील छत्री दुसऱ्याकडे सोपवत धावत जाऊन महिलेचा जीव वाचवला आहे. खरंतर खामगाव तालुक्यातील चिंचपूर गावात काल जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे गावातील नाले तुडुंब भरले असून पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी या नाल्याच्या दोन्ही बाजूला अनेक नागरिक अडकून पडले होते. हे ही वाचा-शेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण दरम्यान काहीजण दोरीच्या साहाय्यानं पुराच्या पाण्यातून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होतो. तेव्हा एका महिलेचा तोल जाऊन तिचा पाय घसरला आणि ती पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जाऊ लागली. तेवढ्यात उपस्थित नागरिकांनी तिला तातडीनं धावत जाऊन पकडलं. यानंतर एका तरुणानं हातातील छत्री दुसऱ्याकडे सोपत पाण्याच्या दिशेनं धाव घेतली अन् महिलेला सुखरुप बाहेर काढलं. हे दृश्य पाहिल्यानंतर अनेकांची चांगलीच भंबेरी उडाली होती. या घटनेनंतर नागरिकांनी पुराच्या पाण्यातून जाण्याचं टाळलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published: