मुंबईतील तिघे रायगडमध्ये नदीत बुडाले, ट्राँम्बे परिसरावर शोककळा

मुंबईतील तिघे रायगडमध्ये नदीत बुडाले, ट्राँम्बे परिसरावर शोककळा

मुंबईतील ट्राँम्बे परिसरात राहणारे तिघांचा रोहा तालुक्यातील बल्ले गावातील कुंडलीका नदीत बूडून मृत्यू झाला आहे. या घटनेने ट्राँम्बे परिसरावर शोककळा पसरली आहे.

  • Share this:

मुंबई, 17 जून- मुंबईतील ट्राँम्बे परिसरात राहणारे तिघांचा रोहा तालुक्यातील बल्ले गावातील कुंडलीका नदीत बूडून मृत्यू झाला आहे. या घटनेने ट्राँम्बे परिसरावर शोककळा पसरली आहे. महेश जेजुरीकर (वय-39), अक्षय गणगे (वय-29) आणि परेश जेजुरीकर (वय-29) अशी मृतांची नावे आहेत. दोघांचे मृतदेह आधीच बाहेर काढण्यात आले आहे. आता तिसराही मृतदेह सापडला आहे. तिसरा मृतदेहाचा सकाळपासून शोध सुरू होता. पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत.

मिळालेली माहिती अशी की, मुंबईतील ट्राँम्बे परिसरातील 28 जणांचा ग्रुप रायगड येथे पर्यटनासाठी आला होता. सर्वजण नदीत पोहोण्यासाठी उतरले होते. तेव्हा अक्षय गणगे हा तरून अचानक पाण्यात बुडू लागला. हे पाहून त्याला वाचविण्यासाठी महेश आणि परेश जेजुरीकर हे दोन्ही भावंडांनी नदीत उडी घेतली. पण यात तिघांचाही नदीत बुडून मृत्यू झाला. रोहा-माणगाल पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून स्थानिक राफ्टींग क्लबच्या सदस्यांच्या मदतीने शोधकार्य सुरु केले आहे. यावेळी महेश जेजुरीकर आणि अक्षय गणगे यांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. पथकाला परेश जेजुरीकर याचा मृतदेहाही सापडला आहे.

Facebook live पडले महागात.. ओव्हरटेकच्या नादात सख्ख्या भावांचा मृत्यू

कार चालवताना facebook live व tik tok व्हिडिओ बनवणे दोन सख्ख्या भावांच्या जीवावर बेतले आहे. संकेत पाटील (वय-28) व पुंकेश पाटील (वय-23) अशी मृतांची नावे आहेत. भरधाव वेगात असलेली कार ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात नागपुरात हातला शिवाराजवळ हा भीषण अपघात झाला. अपघातात इतर दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर काटोल आणि नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

संकेत व पुनकेश हे दोघे मित्रांसोबत कारने फिरायला गेले होते. भरधाव कारमध्ये संकेत व पुनकेशसह त्यांचे मित्र गाण्यांच्या तालावर थिरकत होते. समोरच्या कारला ओव्हरटेक करण्याच्या नादात त्यांची कार रस्त्यावरून उजव्या बाजूला रोडच्या उलटली. या भीषण अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेत असताना दोघांचाही मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे अपघात होण्यापूर्वी मित्र कारमधून फेसबुक लाईव्ह करत होते. त्यामुळे अपघाताचा थरार फेसबुकवर लाईव्ह कैद झाला आहे.

संकेत व पुंकेश हे भाऊ नागपूरच्या कैलासनगरात राहत होते. काटोल तालुक्यात खासगी कामानिमित्त ते मित्रांसह झायलो गाडीने जात होते. गाडीमध्ये एकूण नऊ जण बसलेले होते. एका गाड्यांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्यांची झायलो कार अनियंत्रित झाली आणि गाडी उलटून झाडावर आदळल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे अपघात होईपर्यंत या घटनेचे फेसबुक लाईव्ह सुरुच होते. सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाल्यामुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

VIDEO: 'फेसबुक लाईव्ह'मुळे गेला जीव, अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद

First published: June 17, 2019, 12:40 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading