मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मित्रांसोबत आनंद लुटण्यासाठी गेले...पण घरी परतलेच नाहीत, धुळ्यात 3 जणांचा मृत्यू

मित्रांसोबत आनंद लुटण्यासाठी गेले...पण घरी परतलेच नाहीत, धुळ्यात 3 जणांचा मृत्यू

धुळे शहरातील काही तरुण आपल्या मित्रांसोबत लळींग कुरणातील धबधब्याजवळ वन पर्यटनासाठी गेले होते.

धुळे शहरातील काही तरुण आपल्या मित्रांसोबत लळींग कुरणातील धबधब्याजवळ वन पर्यटनासाठी गेले होते.

धुळे शहरातील काही तरुण आपल्या मित्रांसोबत लळींग कुरणातील धबधब्याजवळ वन पर्यटनासाठी गेले होते.

धुळे, 22 जून : धुळे शहराजवळील मुंबई आग्रा महामार्गाला लागून असलेल्या लळींग कुरणातील धबधब्यात तीन तरुण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लळींग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल लळींग कुरण हे पर्यटन स्थळ असून परिसरातील धबधब्याजवळ ही दुर्घना घडली आहे. बुडालेल्या तीन तरुणांपैकी दोन जण धुळे शहरातील असून एक तरुण हा अमळनेर तालुक्यातील आहे. धुळे शहरातील काही तरुण आपल्या मित्रांसोबत लळींग कुरणातील धबधब्याजवळ वन पर्यटनासाठी गेले होते. दरम्यान धबधब्याच्या पायथ्याशी उतारावर पाय घसरून पडल्याने ही दुर्घटना झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे, मोहाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संगीता राऊत पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी धुळे एसडीआरएफच्या जवानांना पाचारण करण्यात आलं असून SDRF च्या जवानांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. दरम्यान आत्तापर्यंत दोन जणांचे मृतदेह शोधण्यात SDRF च्या जवानांना यश आलं असून आणखी एका तरुणाचा मृतदेह शोधण्याचा कार्य सुरू आहे. लळींग हे पर्यटनस्थळ असल्याने येथे धुळ्यासह परिसरातील पर्यटक पर्यटनासाठी मोठ्या संख्येने येत असतात. पावसाळ्यात येथील धबधब्याच विहंगमदृश्‍य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. त्यातच काही तरुणांना पोहण्याचा व सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही. धबधब्याचा डोह खोल असल्याने पाण्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे येथे दुर्घटना घडतात. लळींग येथील धबधब्यात पावसाळ्यात पोहण्यासाठी अनेक तरुण जात असतात. यापूर्वीही पोहण्यासाठी गेलेल्या तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याचे घटना घडल्या आहेत. त्यामुळे येथे सुरक्षेची व्यवस्था करण्याची वेळोवेळी मागणी होते आहे. संपादन - अक्षय शितोळे
First published:

Tags: Dhule District (Indian District), Dhule news

पुढील बातम्या