गडी-माजलगाव महामार्गावर व्यायाम करणाऱ्या तिघांना अज्ञात वाहनाने चिरडले

गडी-माजलगाव महामार्गावर व्यायाम करणाऱ्या तिघांना अज्ञात वाहनाने चिरडले

व्यायाम करणाऱ्या तीन तरुणांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. गेवराई तालुक्यातील गडी-माजलगाव महामार्गावर तळेवाडी शिवारात हा अपघात घडला.

  • Share this:

बीड, 20 जुलै- व्यायाम करणाऱ्या तीन तरुणांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. गेवराई तालुक्यातील गडी-माजलगाव महामार्गावर तळेवाडी शिवारात हा अपघात घडला. या घटनेमुळे तळेवाडी गावावर शोककळा पसरली आहे. सामान्य परिस्थितीतील तिघे भविष्यात या विद्यार्थ्यांचे पोलिस भरतीसाठीचे नियोजन होते. सुनील प्रकाश थोटे (वय- 15), तुकाराम विठ्ठल यनगर (वय- 17) आणि अभिषेक भगवान जाधव (वय- 16) अशी मृत तरुणांची नावे आहेत.

शनिवारी पहाटे गडी-माजलगाव महामार्गावर तळेवाडी शिवारात तिघेही तरुण व्यायाम करण्यासाठी गेले होते. यादरम्यान अज्ञात वाहनाने या तरुणांना चिरडल्याने त्यांचा मृत्यू झाला. सुनील थोटे व अभिषेक जाधव हे दहावीत होते. सुनील प्रकाश थोटे याला गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. तुकाराम विठ्ठल यनगर याला उपचारासाठी बीडला नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.

तिघे रोज प्रमाणे पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास व्यायाम करण्यासाठी गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या गढी माजलगाव राष्ट्रीय महामार्गावर गेले. यावेळी महामार्गाच्या बाजुला व्यायाम करताना अचानक गढी माजलगावकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिला. यात गंभीर जखमी झालेल्या तिघांना इतर काही व्यायाम करण्यासाठी आलेल्या गावातील तरुणांनी पोलिसांच्या मदतीने तत्काळ रुग्णालयात दाखल केले.

गडी ते माजलगाव या मार्गावर जड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. कुठल्या वाहनाने त्या तरुणांना चिरडले आहे याचा शोध गेवराई पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तळेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

VIDEO: कोथिंबिरीचे भाव गगनाला; पाहा किती आहे किंमत, यासोबत टॉप 18 बातम्या

First published: July 20, 2019, 5:14 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading