Home /News /maharashtra /

HIV Case Nagpur : दूषित रक्त पुरवठ्यातून चिमुकलीला ‘एचआयव्ही’ची लागण, नागपुरातील धक्कादायक प्रकार

HIV Case Nagpur : दूषित रक्त पुरवठ्यातून चिमुकलीला ‘एचआयव्ही’ची लागण, नागपुरातील धक्कादायक प्रकार

सरकारकडून थॅलेसेमियाच्या (Thalassemia) रुग्णांना खासगी आणि सरकारी रक्तपेढीतून मोफत रक्त देण्यात येते आहे. (Blood Bank) मात्र, हे रक्त ‘नॅट टेस्टेड’ नसल्याने थॅलेसेमियाच्या रुग्णांना ‘एचआयव्ही’ धोका निर्माण झाला आहे.

  नागपूर, 23 मे : नागपुरातील तीन वर्षांच्या मुलीला ‘ब्लड बँके’तून (Blood Bank) मिळालेल्या रक्तातून ‘एचआयव्ही’ची (HIV) लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. थॅलेसेमिया (Thalassemia) या गंभीर रक्ताच्या आजाराशी तोंड देत होती. असे असताना या चिमुकलीला कुठल्यातरी ‘ब्लड बँके’तून मिळालेल्या रक्तातून ‘एचआयव्ही’ची लागण झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे आदेश, आरोग्यमंत्री राजेश टोपे (State Health Minister Rajesh Tope) यांनी दिले आहेत. नेमकं काय घडलं? थॅलेसेमिया आजारामुळे या तीन वर्षीय चिमुकलीला वारंवार रक्त द्यावे लागत आहे. सरकारकडून थॅलेसेमियाच्या (Thalassemia) रुग्णांना खासगी आणि सरकारी रक्तपेढीतून मोफत रक्त देण्यात येते आहे. (Blood Bank) मात्र, हे रक्त ‘नॅट टेस्टेड’ नसल्याने थॅलेसेमियाच्या रुग्णांना ‘एचआयव्ही’ धोका निर्माण झाला आहे. या तीन वर्षांच्या चिमुकलीला आठ महिन्यांपूर्वी मुलीला ‘एचआयव्ही’ झाल्याचे निदान झाले. आधीच थॅलेसेमियाचा गंभीर आजार, त्यात ‘एचआयव्ही’ची लागण झाल्याने तिच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. हेही वाचा - बहिणीसोबत मित्राने ठेवले संबंध, भावाने दुचाकीवरच चाकूने सपासप वार करून संपवले, बीड हादरलं
  तर नागपुरातीलच थॅलेसेमियाग्रस्त चार मुलांना रक्तातून ‘एचआयव्ही’ची लागण झाल्याचीही माहिती आहे. या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.
  कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत काय म्हणाले आरोग्यमंत्री राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (State Health Minister Rajesh Tope) यांनी महाराष्ट्रातल्या कोरोना व्हायरसबाबत (Corona Virus in Maharashtra) महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.  राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार नाही, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत नाही. लसीकरण चांगलं झालं आहे. ॲक्टिव्ह रुग्ण 1950 आहेत. सध्या हा फार मोठा विषय नसल्याचं राजेश टोपे म्हणाले आहेत. कोरोनाचा आजचा आकडा 254 नवीन रुग्ण आहेत. रिकव्हरी 98 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. राज्यात कोविडची चौथ्या लाटेच्या चर्चेत आता काही तथ्य वाटत नाही, असंही आरोग्यमंत्री म्हणाले आहेत.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Health, Nagpur News

  पुढील बातम्या