मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /आई वाचली पण, बिबट्याच्या हल्ल्यात लहानग्याचा मृत्यू; नंदूरबारमधील थरारक घटना

आई वाचली पण, बिबट्याच्या हल्ल्यात लहानग्याचा मृत्यू; नंदूरबारमधील थरारक घटना

नंदूरबारमध्ये बिबट्याच्या हल्ल्या एका तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. आईसोबत हा लहानगा रानात गुरं चारण्यासाठी गेला होता.

नंदुरबार, 19 जुलै : आईसोबत रानात गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका तीन वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला

केला. या हल्ल्यात या लहानग्याचा मृत्यू झाला आहे. लकी वीरसिंग पाडवी असं या बालकाचं नाव आहे. तळोदा तालुक्यातील सरदार नगर भागातील ही घटना आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलं आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागासह स्थानिक प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

तळोदा तालुक्यातील सरदार नगर पुर्नवसन वसाहतीच्या परिसरात राहणारा लकी आईसोबत गुरे चारण्यासाठी गेला होता. रानात गुरं चारत असताना बिबट्याने अचानक लकी याच्यावर हल्ला करत त्याला ठार केले. आई बारदा बिरसिंग पाडवी यांच्यावर देखील बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

Jalna Crime : महागाईमुळे चोरांनी चोरीचे प्रकार बदलले पैशासोबत लाखो रुपयांचा किराणाच चोरला

मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्याने सुरवातीला त्यांच्यासोबत असलेल्या बकऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला विरोध करण्यास गेलेल्या आईवर बिबट्याने हल्ला केला. मात्र बारदा यांनी तिथून कसाबसा पळ काढला. मात्र त्यानंतर बिबट्याने तिथे उपस्थित लकीवर हल्ला चढवला आणि यात त्याचा मृत्यू झाला.

भामट्याकडून 4 महिला आमदारांची फसवणूक; पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

या दु्र्देवी घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी परिसरात गर्दी केली होती. स्थानिक आमदार राजेश पाडवी यांच्यासह वनविभागाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण परिसराची पाहणी केली. या घटनेनंतर परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

First published:
top videos

    Tags: Leopard, Maharashtra News