धक्कादायक! घरात वाढदिवसाची तयारी सुरू असताना बाहेर 3 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

धक्कादायक! घरात वाढदिवसाची तयारी सुरू असताना बाहेर 3 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

अवधूत सचिन वाघ असं या मृत चिमुकल्याचं नाव आहे. रविवारी अवधूतचा तिसरा वाढदिवस होता. नेमक्या त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

  • Share this:

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी

नाशिक,  30 सप्टेंबर : पालकांच्या दुर्लक्षामुळे दुर्घटना घडून चिमुकल्यांनी प्राण गमावल्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. एका 3 वर्षाच्या मुलाचा त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खेळता खेळता पाण्याच्या टाकीत पडल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. अवघ्या 3 वर्षाचा मुलगा खेळत असताना पालकांनी लक्ष दिलं नाही आणि त्याचवेळी त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

अवधूत सचिन वाघ असं या मृत चिमुकल्याचं नाव आहे. रविवारी अवधूतचा तिसरा वाढदिवस होता. नेमक्या त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. रविवारी संध्याकाळी नाशिकच्या विहितगाव परिसरात ही घटना घडली आहे. एकीकडे वाढदिवसाची तयारी सुरू असताना दुसऱ्या बाजुला ही घटना घडल्याने संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

घरात वाढदिवसाची तयारी सुरू असताना अवधूत हा घराबाहेर खेळत होता. त्यावेळी तो उघड्या असलेल्या पाण्याच्या टाकीत पडला. या दुर्घटनेत अवधूतचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेनंतर अवधूतला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

इतर बातम्या - भाजप देणार विद्यमान आमदारांना धक्का, या मतदारसंघातून तिकीट कापण्याची शक्यता!

या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस आता संपूर्ण प्रकणाचा कसून तपास करत आहे. अवधूत नेमका पाण्याच्या टाकीत कसा पडला. त्याला टाकीत पडताना कोणी पाहिलं नाही का याचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, अवधूतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

इतर बातम्या - विधानसभेसाठी भाजप पहिली यादी आज येणार, उमेदवारांची नावं निश्चित!

घरातल्या हसत्या खेळत्या मुलाला अशा प्रकारे गमावल्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. तर परिसरातून अवधूतच्या अशा जाण्यावर शोककळा व्यक्त करण्यात येत आहे. खंरतर अशा घटना होऊ नये यासाठी पालकांनी मुलांवर लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे.

First published: September 30, 2019, 10:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading