पिकनिक ठरली अखेरची, सेल्फी काढताना धबधब्यात पडून तरुणीसह दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

पिकनिक ठरली अखेरची, सेल्फी काढताना धबधब्यात पडून तरुणीसह दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

औरंगाबाद येथून काही विद्यार्थी नाशिकमध्ये फिरायला आले होते. दुगारवडी धबधबा पाहण्यासाठी गेले असताना ही घटना घडली.

  • Share this:

नाशिक, 19 डिसेंबर : त्र्यंबकेश्वर येथील दुगारवाडी धबधब्यात वाहून गेल्याने तिघा मित्रांचा मृत्यू झाला आहे. यात तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनूसार मृतांमध्ये एका विद्यार्थिनीचा समावेश आहे. बुधवारी फुरण्यासाठी गेलेले 3 तरुण धबधब्यात बुडाले होते. त्यानंतर तरुणांना शोधण्यासाठी बचावकार्य सुरू होतं. अखेर आज तिघांचे मृतदेह हाती लागले आहेत.

औरंगाबाद येथून काही विद्यार्थी नाशिकमध्ये फिरायला आले होते. दुगारवडी धबधबा पाहण्यासाठी गेले असताना ही घटना घडली. बुडालेले सर्व विद्यार्थी तेलंगणा राज्यातील असल्याची माहिती आहे. मात्र, शिक्षणासाठी ते औरंगाबाद शहरात राहत होते. त्यानुसार त्यांची ओळख पटवून कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, धबधब्याजवळ सेल्फी काढत असताना पाय घसरून खआली पडले आणि पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये एका मुलीचाही समावेश आहे. खेळताना अशा प्रकारे जीव गमावल्यामुळे इतर विद्यार्थ्यांमध्ये आणि कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे. दरम्यान, पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा शोध घेत असून नेमका अपघात कसा झाला याचा पोलीस शोध घेत आहे.

धबधब्यातून मिळालेले तीन मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. खरंतर पाण्याच्या ठिकाणी जास्त खोल जाऊ नका, मस्ती करू नका अशा वारंवार सुचना दिल्या जातात पण त्यावर उत्साहाच्या भरात दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत. खरंतर गेल्या काही दिवसांमध्ये अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. त्यात आज मुंबईतही एक विचित्र अपघात झाला.

BREAKING: मुंबईत पहाटेच्या सुमारास शिवसेना नेत्यावर अज्ञातांकडून गोळीबार

मनसे आमदार पुत्राच्या गाडीचा विचित्र अपघात, कारचा चक्काचूर!

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या मुलाच्या गाडीचा डोंबिवलीमध्ये अपघात झाला. गाडी भरधाव वेगाने उड्डाणपुलावरून थेट कोकण रेल्वे रुळावर कोसळली. रात्री साडे अकराच्या सुमारास हा अपघात झाला. यात कारचे नुकसान झाले असून कोणतीही जिवित हानी झाली नसल्याचे समजते.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, डोंबिवलीतील एक्सपेरीया मॉल ते काटई टोल नाक्याजवळ कारचा अपघात झाला. या ठिकाणी असलेल्या उड्डाणपुलावरुन कार भरधाव वेगाने खाली कोकण रेल्वे रुळावर कोसळली. ही कार मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचा मुलगा आदित्य पाटील यांची आहे. अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मनसे आमदार राजू पाटील यांच्या मुलाची गाडी पेट्रोल भरून काटई नाका ते पलावा सिटी येथे निघाले होती. त्यावेळी एक्सपेरीया मॉल उड्डाणपुलावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी थेट उड्डाण पुलाखाली असलेल्या कोकण रेल्वे रुळावर पडली. या अपघातात कोणीही जखमी झाले नसून गाडीतील चालकाला थोडंदेखील खरचटलं नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

इतर बातम्या - हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस गाजणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उत्तराकडे लक्ष

अपघातग्रस्त कार ही 'मुश्तान्ग' कंपनीची आहे. या गाडीची किंमत 75 लाख इतकी आहे. अपघातानंतर आमदार राजू पाटील यांच्याशी संपर्क साधला असता यामध्ये कोणाला साधं खरचटलंसुद्धा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 19, 2019 10:18 AM IST

ताज्या बातम्या