मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

20 सेकंदात तीन मजली इमारत जमीनदोस्त; जळगावातील थरारक घटनेचा LIVE VIDEO

20 सेकंदात तीन मजली इमारत जमीनदोस्त; जळगावातील थरारक घटनेचा LIVE VIDEO

अवघ्या काही सेंकदात तीन मजली इमारत जमीनदोस्त झाली आहे.

अवघ्या काही सेंकदात तीन मजली इमारत जमीनदोस्त झाली आहे.

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पाचोरा (Pachora) याठिकाणी तीन मजली इमारत कोसळल्याची (three storey building collapsed) घटना उघडकीस आली आहे.

जळगाव, 21 सप्टेंबर: जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पाचोरा (Pachora) याठिकाणी तीन मजली इमारत कोसळल्याची (three storey building collapsed) घटना उघडकीस आली आहे. अवघ्या काही सेंकदात तीन मजली इमारत जमीनदोस्त झाली आहे. संबंधित थरारक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल (Viral Video) होतं आहे. इमारतीत काही तांत्रिक दोष राहिल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून मालमत्तेचं बरंच नुकसान झालं आहे. संबंधित घटना पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागात घडला आहे. पाच वर्षांपूर्वी संबंधित तीन मजली इमारत उभारण्यात आली होती. पण ही इमारत बांधताना काही तांत्रिक दोष राहीले होते. त्यातूनच हा अपघात घडला आहे. मुंबई येथील रहिवासी असणाऱ्या साजेदाबी शेख खलील यांनी पाचोरा येथे गुंतवणूक म्हणून ही तीन मजली इमारत उभारली होती. पाच वर्षांपूर्वी बांधलेल्या या  इमारतीला पावसामुळे तडा गेला होता. हेही वाचा-मूल होण्यासाठी विवाहितेसोबत अघोरी प्रयोग;कोंबडीचं रक्त पाजून सासऱ्याकडून विनयभंग इमारतीला तडा गेल्याने येथे राहाणाऱ्या  भाडेकरूंनी तातडीने इमारत रिकामी केली होती. दरम्यान काल रात्री दहाच्या सुमारास आलेल्या रिमझिम पावसामुळे ही इमारत अचानक कोसळली आहे. अवघ्या काही सेकंदात ही इमारत जमीनदोस्त झाली आहे. सुदैवाने या दुर्घटेत कोणतीही  जीवितहानी झाली नाही. हेही वाचा-आयुष्यभर जी ST चालवली त्याच बसमध्ये घेतला गळफास, घटनेने महाराष्ट्र हादरला विशेष म्हणजे, पाचोरा नगर परिषदने हा रोड यापूर्वीच बंद केला होता. ही घटना घडल्यानंतर कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली आहे. परीसरातील आणि शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी काळजी घेतल्याने जीवितहानी झाली नाही. इमारत कोसळतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतं आहे.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Jalgaon

पुढील बातम्या