मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भाऊबीजेच्या दिवशी तीन बहिणी असलेल्या शिवमची निर्घृण हत्या, चारही आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

भाऊबीजेच्या दिवशी तीन बहिणी असलेल्या शिवमची निर्घृण हत्या, चारही आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

भाऊबीजेच्या दिवशी तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ असलेल्या शिवमची हत्या करणारे गजाआड

भाऊबीजेच्या दिवशी तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ असलेल्या शिवमची हत्या करणारे गजाआड

Four accused arrested in shivam murder case at Manmad railway station : मनमाड रेल्वे स्थानकात हत्या करण्यात आलेल्या शिवम पवार याचे मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

मनमाड, 10 नोव्हेंबर : भाऊबीजेच्या (Bhau Beej) दिवशी मनमाड रेल्वे स्थानकावर (Manmad Railway Station) तरुणाची हत्या करून फरार झालेल्या 4 आरोपींना अटक करण्यात रेल्वे पोलिसांना (Railway police arrest 4 accused) यश आले आहे. चारही आरोपींना पोलिसांनी रायगड (Raigad) जवळ नराळे येथे ताब्यात घेतले. त्याननंतर या चारही आरोपींना पोलिसांनी मनमाडला आणले आणि अटक केली.

प्रेम प्रकरण आणि इंस्टाग्रामवर अश्लील फोटो टाकल्याच्या कारणावरून शिवम पवार आणि आरोपींमध्ये 6 नोव्हेंबरला मनमाड रेल्वे स्थानकावर वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपींनी शिवमवर चाकूने वार करून त्याचा निर्घृणपणे खून केला. यानंतर आरोपी फरार झाले होते. तेव्हापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते.

आरोपी रायगडच्या नराळे या भागात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली आणि चारही आरोपींना जेरबंद करण्यात आले. चेतन मोधळे, मयूर कराळे, निशांत जमधाडे आणि मोहित सुकेजा अशी या आरोपींची नावे असून सर्व कर्जत भागातील आहेत. रेल्वे पोलिसांनी या आरोपीवर भादवी 302 चा गुन्हा दाखल केला आहे.

तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ

मनमाड रेल्वे स्थानकात (Manmad Railway Station) ही घटना घडली होती. रेल्वे स्थानकातील प्रवाशांसमोर ही हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हत्या झालेल्या युवकाचे नाव शिवम पवार (Shivam Pawar) असे असून त्याला तीन बहिणी आहेत. भाऊबीजेच्या (Bhai dooj) दिवशीच असं घडल्याने संपूर्ण पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

रेल्वे स्थानकावर नंदीग्राम एक्स्प्रेस उभी होती त्यावेळी 4 तरुणांनी शिवम याच्यावर धारदार शस्त्राने 5 ते 6 वार केले. या हल्ल्यात शिवम गंभीर जखमी झाला, त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. हल्ला केल्यानंतर मारेकरी नंदीग्राम एक्स्प्रेसने मुंबईकडे फरार झाले होते.

प्रेम प्रकरणातून ही हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती असून हत्त्या करण्यात आली तेव्हा मुलगी देखील त्या ठिकाणी होती. आता या प्रकरणातील चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींच्या चौकशीनंतर या हत्याकांडामागचे नेमकं कारण काय याचा उलगडा होईल. शिवमला 3 बहिणी असून भाऊबाजीच्या दिवशी भावाची हत्या झाल्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.

हिंगोलीत बहीण-भावावर काळाचा घाला

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. दिवाळीसाठी मामाच्या गावाला जाणाऱ्या बहीण-भावाचा एका भीषण अपघातात दुर्दैवी अंत झाला आहे. ऐन भाऊबीजेआधी दोघांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्दैवी घटनेनात मृत बहीण-भावाची मोठी बहीण आणि मामा देखील जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

First published:

Tags: Crime, Murder, महाराष्ट्र