Home /News /maharashtra /

Murbad : तरुणांना भरदिवसा बेल्ट, दांडुका आणि लाथा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण, कारण...

Murbad : तरुणांना भरदिवसा बेल्ट, दांडुका आणि लाथा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण, कारण...

मुरबाडच्या एका नमस्कार सभागृहात साड्यांचा सेल लागला होता. या सेलमध्ये एक पीडित तरुण गेला होता. त्याने गंमत म्हणून एक व्हिडीओ शेअर केला होता. पण त्याच व्हिडीओवरुन मोठा गदारोळ झाला.

ठाणे, 23 जानेवारी : सोशल मीडियावर (Social Media) सध्या व्हिडीओ बनवण्याचा ट्रेंड आला आहे. हा ट्रेंड मुरबाडमधील (Murbad) तरुणांसाठी भलताच महागात पडला आहे. गेल्या महिन्याभरापूर्वी दुकानमध्ये खरेदी करत असताना काही तरुणांनी मजा म्हणून व्हिडीओ बनवला होता. या व्हिडीओच्या माध्यमातून महिलांची छेडछाड करण्याचा आरोप करण्यात आला. संबंधित व्हिडीओवरुन महिन्याभरानंतर तीन रिक्षा चालकांनी बेल्ट, दांडुका आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण (beat) केली. व्हिडीओ बनवला म्हणून तरुणांना भरदिवसा ही मारहाण झाली. या घटनेचा व्हिडीओ शूट करुन या तीन रिक्षाचालक गुंडांनी व्हायरल केला. पोलिसांनी या तीनही रिक्षा चालकांना अटक (arrest) केली आहे. या घटेनवर मुरबाडचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी प्रतिक्रिया दिली. "मुरबाड भागात एसटी स्टॅण्डवर दोन दिवसांपूर्वी दोन मुलांना काही लोकांनी त्यांनी चुकीच्या विचाराने व्हिडीओ बनवल्याचा संशय मनात घेऊन मारहाण केली. आरोपींनी त्यांना पट्टा आणि काठीने मारहाण केली. या घटनेबाबत आम्हाला सोशल मीडियातून माहिती मिळाली. त्या अनुषंगाने आम्ही त्यातील फिर्यादींना शोधून, त्यांना विश्वासात घेऊन त्याची एफआयआर केलेली आहे. जे मारहाण करणारे आहेत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांना अटकही करण्यात आलेली आहे", अशी प्रतिक्रिया प्रसाद पांढरे यांनी दिली. घटनेची सविस्तर माहिती मुरबाडच्या एका नमस्कार सभागृहात साड्यांचा सेल लागला होता. या सेलमध्ये एक पीडित तरुण गेला होता. त्याने गंमत म्हणून एक व्हिडीओ शेअर केला होता. पीडित तरुणाने व्हिडीओ बनवला तेव्हा तिथे साड्या घेण्यासाठी महिलाही आलेल्या होत्या. त्या व्हिडीओत त्या महिलाही दिसत होत्या. याच गोष्टीचा धागा पकडत आरोपींनी पीडित तरुणांवर महिलांची छेड काढल्याचा आरोप केला होता. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ मुरबाडमध्ये राहणाऱ्या तीन रिक्षा चालकांपर्यंत पोहोचला. त्यांनी महिलांची छेड काढल्याच्या गैरसमजूतीतून व्हिडीओ बनवणाऱ्या मुलांना मारहाण केली. (Jio युजर्सला लवकरच मिळणार 5G सुविधा, वाचा काय आहे प्लॅन) आरोपी रिक्षा चालकांनी मुलांना बस स्टॅण्डवर बोलावून घेतलं. त्यानंतर अक्षरश: दांडके आणि पट्ट्याने मारहाण केली. विशेष म्हणजे बस स्टॅण्डवर गजबजलेल्या ठिकाणी ही मारहाणीची घटना घडली. अनेकांनी बघ्याची भूमिका घेतली. पण कुणीही त्या ठिकाणी मध्यस्थीची भूमिका केली नाही. त्यामुळे मारहाण करणाऱ्यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, असा विचार स्थानिकांच्या मनात येत होता. संबंधित घटनेमुळे तरुण भयभीत झालेले होते. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली नव्हती. पण त्यांना मारहाण करताना आरोपी रिक्षा चालकांनी व्हिडीओ बनवला होता. तो व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. हा व्हिडीओ जेव्हा पोलिसांच्या हाती लागला तेव्हा त्यांनी तपास सुरु केला. तरुणांना बोलवण्यात आलं. रितसर तक्रार नोंदवण्यात आली. मुरबाड सारख्या ग्रामीण भागात अशी धक्कादायक घटना समोर आली आहे.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या