Home /News /maharashtra /

तेरवीसाठी निघालेल्या कुटुंबीयावर काळाचा घाला, मायलेकीचा जागीच मृत्यू; नंतर वडिलांनीही सोडले प्राण

तेरवीसाठी निघालेल्या कुटुंबीयावर काळाचा घाला, मायलेकीचा जागीच मृत्यू; नंतर वडिलांनीही सोडले प्राण

चंद्रपूरमध्ये (Chandrapur) भीषण (terrible accident) अपघात झाला आहे.

    चंद्रपूर, 06 डिसेंबर: चंद्रपूरमध्ये (Chandrapur) भीषण (terrible accident) अपघात झाला आहे. तेरवीच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या कुटुंबीयांवर काळानं घाला घातला आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले. कार अनियंत्रित झाल्याने अपघात घडला. पिंपळनेरी-खापरी मार्गावर हा भीषण अपघात झाला. या अपघातात मायलेकीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर चंद्रपुरात उपचारादरम्यान वडिलांनी प्राण सोडला. हेही वाचा-  राज्यातील Omicron च्या रुग्णांचा आकडा 8 वर, राजेश टोपे म्हणतात... समोर आलेल्या माहितीनुसार, या अपघातात दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी चंद्रपूरमध्ये नेण्यात आलं आहे. ही घटना रविवारला संध्याकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली. मृतकांमध्ये सायत्रा मोतीराम मेश्राम ( वय 65 वर्ष ), मोतीराम भिकारी मेश्राम ( वय - 70 ), कमल उत्तम चूनारकर ( वय 50 वर्ष ) या तिघांचा समावेश आहे. उत्तम चुनारकर (वय 45, रा. चंद्रपूर) आणि अंकित राजू मेश्राम (वय 10, रा. खापरी) हे गंभीर जखमी झाले. हेही वाचा- बिबट्याच्या कातडीची तस्करी, तब्बल 12 जणांच्या आवळल्या मुसक्या  खापरी धर्मू येथील मेश्राम आणि चुनारकर कुटुंबीय कारनं सरडपार येथे तेरवीच्या कार्यक्रमासाठी जात होतं. पिंपळनेरी-खापरी मार्गावरील उमरी फाट्याजवळ कारवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे कार पलटली. या घटनेनं खापरी गावात शोककळा पसरली आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Chandrapur

    पुढील बातम्या