मतदान करून येताना अपघात, तिघांचा मृत्यू तर 9 जण जखमी!

मतदान करून येताना अपघात, तिघांचा मृत्यू तर 9 जण जखमी!

गडचिरोली येथे मतदान करून परत येताना झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला.

  • Share this:

गडचिरोली, 11 एप्रिल: गडचिरोली येथे मतदान करून परत येताना झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. या अपघातात अन्य 9 जण जखमी झाले आहेत. गडचिरोलीमधील शंकरपूरवाडी गावाजवळ हा अपघात झाला. हे सर्व जण मतदान करून पुन्हा घरी येताना अपघात झाल्याचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे.

शंकरपूरवाडी गावाजवळ ट्रॅक्टर उलटल्याने हा अपघात झाल्याचे समजते. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

VIDEO: उमेदवाराने चक्क ईव्हीएमच जमिनीवर आदळलं

First published: April 11, 2019, 3:54 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading