मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मॉर्निंग वॉकला गेलेल्या तिघांना अज्ञात वाहनाने चिरडले; दोघांचा जागीच मृत्यू, घटनास्थळावरुन वाहनचालकाने काढळा पळ

मॉर्निंग वॉकला गेलेल्या तिघांना अज्ञात वाहनाने चिरडले; दोघांचा जागीच मृत्यू, घटनास्थळावरुन वाहनचालकाने काढळा पळ

vehicle crushed three people in bulhdana: बुलडाण्यात एक भीषण अपघात झाला आहे. अज्ञात वाहनाने तिघांना चिरडले.

vehicle crushed three people in bulhdana: बुलडाण्यात एक भीषण अपघात झाला आहे. अज्ञात वाहनाने तिघांना चिरडले.

vehicle crushed three people in bulhdana: बुलडाण्यात एक भीषण अपघात झाला आहे. अज्ञात वाहनाने तिघांना चिरडले.

  • Published by:  Sunil Desale

राहुल खंदारे, प्रतिनिधी

बुलडाणा, 1 ऑक्टोबर : मॉर्निंग वॉकला (Morning walk) गेलेल्या तिघांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना समोर आली आहे. बुलडाण्यातील (buldhana) मोताळा डीडोळा फाट्यावर हा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, तिघांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे (2 died on the spot). तर एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमी इसमाला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा मृत्यू

सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या तिघांना वाहनाने चिरडले असून त्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. एक जण गंभीर जखमी आहे. अमोल गाढे रा. डिडोळा आणि दीपक कायस्थ नगरपरिषद कर्मचारी मोताळा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर कमलेश जुनारे हे गंभीर जखमी झाले आहेत. कमलेश यांना उपचारासाठी बुलडाणा येथे हलविण्यात आले आहे. या घटनेनंतर वाहनचालकाने घटनास्थळावरुन गाडीसह पळ काढला. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या वाहनचालकाचा शोध घेत आहेत.

खड्डे वाचवण्याच्या नादात 3 गाड्यांचा विचित्र अपघात; कार थेट भातसा नदीत

राज्यातील खड्ड्यांची समस्या ही काही नवी नाही. अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये अनेक अपघात घडल्याचे समोर आले आहेत. असाच एका अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. ही घटना शहापूर तालुक्यात घडली आहे. शहापूर तालुक्यात खड्डे वाचविण्याच्या नादात चार चाकी कार थेट भातसा नदी पात्रात गेल्याचं दिसून येत आहे. या घटनेनंतर आजूबाजूच्या नागरिकांनी कार चालकाला नदीतून बाहेर काढले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

शहापूर तालुक्यातील भातसा नदीवरील सापगाव पुलावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहे. या खड्ड्यांपासून वाचण्याच्या नादात शेणवे येथील विकास शिर्के यांचा आपल्या कारवरील ताबा सुटल्याने ही कार थेट भातसा नदीत पात्रात पडली. सुदैवाने येथे उपस्थित नागरिकांनी तत्परता दाखवून कार चालकाला बाहेर काढून उपचारासाठी शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे, त्यामुळे पुन्हा एकदा शहापूर-मुरबाड रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मुंबईत वाहन चालकाचा माज

मुंबईतील अंधेरी आझाद नगर मेट्रो स्टेशनजवळ 9 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता, जेपी रोडवर एक वाहतूक पोलीस हवालदार आपल्या टीमसह कारवाई करीत होता. त्यावेळी हुंडाई क्रेटा कारला हात दाखवून रोखण्यासाठी सांगण्यात आलं, मात्र तो थांबण्याऐवजी पळ काढू लागला. ज्यानंतर वाहतूक पोलीस कारच्या बोनेटवर बसला आणि कार चालकाला बाहेर येण्यास सांगू लागला. तोपर्यंत मोठी गर्दी जमा झाली होती. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वाहतूक पोलीस वारंवार कार चालकाला खाली उतरण्याची विनंती करीत होता. मात्र कार चालक खाली उतरण्याऐवजी बोनेटवर बसलेल्या वाहतूक पोलिसासह जलद गतीने कारला चालवत होता. आणि काही वेळ गेल्यानंतर हवालदार खाडी पडला. त्यानंतर संधी साधत गाडी चालकाने गाडी मागे फिरवली आणि तेथून फरार झाला.

First published:

Tags: Accident, Buldhana news